@maharashtracity

मुंबई: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांत आतापर्यंत चांगला पाऊस पडला आहे. त्यामुळे सध्या सात तलावांत १२ लाख ७७ हजार ७८७ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा झाला आहे. तर गतवर्षी याच कालावधीत तलावांत ९ लाख ८७ हजार ३२५ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा झाला होता. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा तलावांत २ लाख ९० हजार ४६२ दशलक्ष लिटर म्हणजे २० टक्के जास्त पाणीसाठा (water storage) जमा झाला आहे.

अद्यापही पावसाळ्याचे (monsoon) दोन महिने बाकी आहेत. त्यामुळे पुढील कालावधीत तलावांत आणखीन चांगला पाऊस पडून सर्व तलाव भरून वाहू लागतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

तसेच, जुलै महिन्याच्या प्रारंभीपासून चांगला मुसळधार पाऊस तलाव क्षेत्रात पडला. त्यामुळे सातपैकी मोडकसागर, तानसा व तुळशी हे तीन तलाव भरून वाहू लागले आहेत. ही बाब मुंबईकरांसाठी दिलासा देणारी आहे.

मुंबईला दररोज ३,८५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो. सध्या तलावांत जमा १२ लाख ७७ हजार ७८७ दशलक्ष लिटर पाणीसाठा हा पुढील ३३१ दिवस म्हणजे ११ महिने पुरेल इतका म्हणजेच पुढील २२ जून २०२३ पर्यन्त पुरेल इतका आहे.

सात तलावातील गतवर्षी व यंदाचा पाणीसाठा

तलाव      २७ जुलै २०२१   २७ जुलै २०२२ 
                दशलक्ष लि.         दशलक्ष लि. 

————- ———— —————————-
उच्च वैतरणा ९८,५५८ १,८१,९४९

मोडकसागर १,२८,९२५ १,२८,९२५

तानसा १,४३,५३४ १,४३,७६९

मध्य वैतरणा १,२५,७५४ १,८३,९२७

भातसा            ४,५४,८१०    ६,०९,९८३

  विहार            २७,६९८       २१,१८८

तुळशी ८,०४६ ८,०४६

 एकूण          ९,८७,३२५     १२,७७,७८७

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here