@maharashtracity

आशियाई फुटबॉल स्पर्धेसाठी विकासकामे

स्थायी समितीकडून प्रस्तावाला मंजुरी

मुंबई: मुंबई महापालिकेच्या (BMC) अंधेरी येथील स्पोर्टस कॉम्प्लेक्समध्ये (Andheri Sports Club) फेब्रुवारी – मार्च २०२२ या कालावधीत आशियाई महिला करंडक फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे या स्पोर्टस कॉम्प्लेक्समध्ये ६० लाख रुपये खर्चून मोठ्या प्रमाणात दुरुस्ती व विकासात्मक कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे हे कॉम्प्लेक्स लवकरच कात टाकणार आहे. या कामांसाठी आवश्यक असणारा ६० लाखांचा निधी बृहन्मुंबई क्रीडा आणि ललित कला प्रतिष्ठान यांना देण्यात येणार आहे.

यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या बुधवारी पार पडलेल्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. यासंदर्भातील माहिती स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली.

या स्पोर्टस कॉम्प्लेक्समध्ये काही दुरुस्ती, सुविधा आणि रंगरंगोटी आदी कामे करण्यात येणार आहेत.

बृहन्मुंबई क्रीडा आणि ललित कला प्रतिष्ठानच्या अंधेरी येथील स्पोर्ट कॉम्प्लेक्स (शहाजी राजे भोसले क्रीडा संकुल) येथे आशियाई कप महिला फुटबॉल स्पर्धा २०२२ (Asian Cup Women’s Football Championship) चे आयोजन करण्यात आले आहे. या मोठ्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Tourism Minister Aaditya Thackeray) यांच्या उपस्थितीत आयुक्त, अतिरिक्त पूर्व उपनगरे आणि एशियन फुटबॉल फेडरेशनचे पदाधिकारी यांच्यात बैठकही झाली होती.

यानुसार २० जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत मुंबई (Mumbai), नवी मुंबई (Navi Mumbai) आणि पुणे (Pune) येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या स्पर्धेसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here