@maharashtracity

मुंबई: मुंबईतील सायन, कुर्ला येथील शीतल तलाव आणि डिगेश्वर तलाव या तीन तलावांत मिश्रित होणाऱ्या बिन पावसाळी पाण्याचा प्रवाह अन्यत्र वळविण्याच्या कामांसाठी मुंबई महापालिका (BMC) सल्लागार नेमणार आहे. या संदर्भांतील प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर होणार आहे.

या प्रस्तावावर विरोधी पक्ष व भाजप यांनी सकारात्मक भूमिका घेतल्यास हा प्रस्ताव मंजूर होईल अथवा या दोन्ही पक्षांनी विरोधी भूमिका घेऊन नकारात्मक भूमिका घेतल्यास प्रस्ताव फेटाळून लावला जाऊ शकतो.

सायन येथील सायन तलाव, कुर्ला येथील शीतल तलाव आणि पश्चिम उपनगरातील डिगेश्वर तलाव या तीन तलावांमध्ये मिश्रित होणारे सांडपाणी व त्यामुळे तलावातील पाण्यात होणारे प्रदूषण रोखण्यासाठी राष्ट्रीय हरित लवादाने (National Green Tribunal – NGT) व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश मुंबई महापालिकेला दिले होते. त्यानुसार, मुंबई महापालिकेने त्याची गंभीर दखल घेऊन या कामासाठी सल्लागार नेमण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार पालिकेने टेंडर काढले. त्यास दोन कंत्राटदारांनी योग्य प्रतिसाद दिला. त्यानुसार मेसर्स टंडन अर्बन सोल्युशन प्रा. कंपनीने सर्वाधिक कमी दर भरल्याने व ते पालिका स्तरावर पात्र ठरल्याने पालिकेने या सल्लागाराला काम देण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार, या कंत्राटदाराला पालिकेकडून तलावातील प्रदूषण रोखण्यासाठी व आवश्यक उपाययोजना करण्यासाठी मेसर्स टंडन अर्बन सोल्युशन प्रा. कंपनीला हे काम देण्याचा निर्णय घेतला त्यासाठी पालिका या सल्लागाराला ९९ लाख ९९ हजार ९९९ रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here