@maharashtracity

मुंबई: महापालिकेच्या (BMC) भायखळा, माझगाव परिसरातील नागरिकांना घरोघरी ओला व सुका कचरा वेगवेगळा जमा करण्यासाठी व त्या कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या आदेशाने २२ लिटर क्षमतेचे (११ लिटर ओला कचरा व ११ लिटर सुका कचरा) १० हजार डबे खरेदी करण्यात येणार आहेत.

त्यासाठी पालिका कंत्राटदार मे. पंचरत्न प्लास्टिक या कंत्राटदाराला १ कोटी ८१ लाख ६० हजार रुपये अदा करणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे.

कचरा डब्यांचा पुरवठा करण्यासाठी पालिकेने टेंडर काढले होते. त्याला तीन कंत्राटदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. मात्र सर्वात कमी दरात म्हणजे प्रति कचरा डबा १ हजार ८१६ रुपये प्रमाणे १० हजार कचरा डबे १ कोटी ८१ लाख ६० हजार रुपये एवढ्या किमतीत कंत्राटदार पुरवठा करणार आहे.

यासंदर्भातील प्रस्ताव मंजूर केल्यानंतर त्याबाबतचे कार्यदेश कंत्राटदाराला प्राप्त झाल्यावर पुढील ४५ दिवसांत सदर कचरा डब्यांचा पुरवठा करणे बंधनकारक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here