@maharashtracity
मुंबई: वरळी येथे शनिवारी अंबिका बिल्डरच्या निर्माणाधिन इमारतीमध्ये काम सुरु असताना लिफ्ट कोसळून ५ कामगारांचा मृत्यू झाला होता तर एकजण गंभीर जखमी झाला होता.
या गंभीर जखमी लक्ष्मण मंडल (३५) चा आज केईएम रुग्णालयात उपचार सुरू असताना रविवारी सायंकाळच्या सुमारास मृत्यू झाला. त्यामुळे आता या दुर्घटनेतील मृतांची संख्या ६ झाली आहे.