@maharashtracity

डेंग्यू गॅस्ट्रोच्या रुग्णात वाढ

मुंबई: मुंबईत साथीच्या आजारांतील मलेरियाचा ताप वाढला असून डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णात वाढ झाल्याचे समोर येत आहे. (Rise in Malaria and gastro patients in Mumbai)

चालू वर्षात आतापर्यंत मुंबई शहर व उपनगरात मलेरियाचे ४१७२ रुग्ण आढळून आले असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. डेंग्यूची तसेच मलेरियाच्या डासांचीे पैदास होण्यास पूरक वातावरण निर्माण झाले असल्याने मुंबईत डेंग्यू मलेरियाचे रुग्ण वाढत आहेत.

यावर्षी जून, जुलै. ऑगस्ट, सष्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात मुंबई शहरात मलेरिया रुग्णांच्या संख्येत चढ-उतार दिसून आला. सन २०२० च्या तुलनेत यंदा मलेरिया रुग्णसंख्येत किंचित घट असली तरीही, मलेरिया रोखण्यासाठी पालिकेला अपयश येत असल्याची टिका होत आहे.

मलेरिया प्रतिबंधांसाठी पालिका करत असलेलय उपाययोजना तोकड्या पडत असल्याची तक्रार लोकप्रतिनिधी करत आहेत. तर नागरिकांमध्येही अजूनही जनजागृतीचा अभाव असल्याचे समोर येत आहे.

दुसरीकडे, ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत मलेरियाचे १६९ रुग्ण आढळून आले आहेत. तर लेप्टो १७, डेंग्यू ९७, गॅस्ट्रो ७३, हेपाटायटिस १३, चिकनगुनिया १५, एच१एन१चे ४ रुग्ण आढळून आले असल्याचे पालिका आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

या शिवाय २०१९ मध्ये मलेरियाचे ४३५७ रुग्ण आढळले होते. तर २०२० मध्ये ५००७ आणि २०२१ मध्ये आतापर्यंत ४१७२ रुग्ण आढळले आहेत. तसेच दरवर्षी साथीच्या आजाराने अनेकांचा मृत्यू होतो. त्यामुळे आजार व मृत्यू रोखण्यासाठी पालिकेकडून विशेष उपाययोजना करण्यात येतात.

यंदाच्या वर्षात साथीच्या आजारांनी ७ जणांचा बळी घेतला आहे. यात लेप्टोने ४ जणांचा बळी घेतला आहे, तर डेंग्यूने ३ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here