सुरक्षारक्षकांच्या तत्परतेने बचावला

 @maharashtracity

मुंबई: मुंबईत (Mumbai) पावसाची रिमझीम सुरू असताना शनिवारी सायंकाळच्या सुमारास वरळी येथे एका निर्माणाधिन इमारतीची लिफ्ट कोसळून (lift collapsed) झालेल्या दुर्घटनेत पाच कामगार गंभीर जखमी झाले. त्यापैकी पाच कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर एकजण जखमी अवस्थेत केईएम रुग्णालयात (KEM hospital) उपचार घेत आहे. 

घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दलाचे जवान पोहोचण्यापूर्वीच पालिकेच्या सुरक्षादलाचे सुरक्षारक्षक संभाजी मडगे, लक्ष्मण मडगे व सिद्धेश तांबडे यांनी धैर्य दाखवून इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ज्या ठिकाणी तो रुग्ण जखमी अवस्थेत पडला होता त्यांच्यापर्यंत पोहोचून त्याला तत्परतेने मदत केल्याने रुग्णालय प्रशासन, डॉक्टर, कर्मचारी वर्ग यांच्याकडून या सुरक्षारक्षकांचे कौतुक करण्यात येत आहे.    

सायन रुग्णालयाचे सहाय्यक सुरक्षा अधिकारी सूरज शेडगे यांनी या तिन्ही सुरक्षारक्षकांचे विषेश कौतुक करीत त्यांच्या पाठीवर शाबासकीच्या थाप दिली. त्यामुळे या तिन्ही सुरक्षारक्षकांना गहिवरून आले. 

प्राप्त माहितीनुसार, सायन रुग्णालयात राजेश नवीन मिस्त्री (४५) या रुग्णाच्या डोक्यावर काहीसा परिणाम होऊन त्याला मानसिक आजार झाल्याने त्याच्यावर रुग्णालयीन इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरील रुग्ण कक्षात उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरू असतानाच या रुग्णाने शनिवारी सकाळी वॉर्डबॉय काही कामासाठी कक्षाबाहेर गेला असता अचानकपणे दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी घेतली.

त्याने केलेली ही कृती आत्महत्या करण्याचा प्रयत्न होता की रुग्णालयातून पळून जाण्याचा प्रयत्न होता हे अद्याप कळू शकलेले नाही. मात्र त्याच्या सुदैवाने तो थेट खाली जमिनीवर न कोसळता पहिल्या मजल्यावरील रॅम्पच्या ठिकाणी पडला.

त्यामुळे त्याला मार लागून तो जखमी झाला. ही बाब त्याठिकाणी रुग्णालय गेटवर कर्तव्य बजावणाऱ्या पालिका सुरक्षा संभाजी मडगे, लक्ष्मण मडगे व सिद्धेश तांबडे यांच्या लक्षात आली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता व पोलीस आणि अग्निशमन दलाची वाट न पाहता तात्काळ पहिल्या मजल्यावर धाव घेतली. तोपर्यंत त्यांनी खिडकीची जाळी तोडून त्यामार्गे पहिल्या मजल्यावर ज्या ठिकाणी तो रुग्ण जखमी अवस्थेत पडला होता तेथे जाऊन त्याला स्ट्रेचरद्वारे सुखरूप आणले. तसेच, त्या रुग्णाला तात्काळ ट्रॉमा विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यामुळे वेळीच उपचार झाल्याने त्या रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.  

त्या रुग्णाच्या डोक्यावर व मनावर काहीसा परिणाम झाल्याने त्यातून त्याने हे कृत्य केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र त्या रुग्णाला तत्परतेने वाचवल्याबद्दल सदर सुरक्षारक्षकांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here