@maharashtracity

मुंबई: मुंबईत (Mumbai) बुधवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरु होती. उपनगरातील तुरळक ठिकाणी जाेरदार वाऱ्यासह मुसळधार सरी झाल्या. त्यामुळे सकाळी कामासाठी घराबाहेर पडलेल्या चाकरमान्यांची तारांबळ उडाली. मात्र रस्ते वाहतूक किंवा रेल्वे सेवेवर परिणाम झाला नाही.

दरम्यान मुंबईला पाणी पुरविणाऱ्या तलावांच्या पाणलाेट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने तलावांच्या जलसाठ्यात वाढ झाल्याची माहिती पालिकेकडून सांगण्यात आली.

आजच्या पावसात वाऱ्याची प्रमुख भूमिका राहिली. वाऱ्याच्या वेगातील बदल घडवणारे क्षेत्र (Shear zone) निर्माण झाल्याने मुंबईत पाऊस (raining in Mumbai) झाला असल्याचे मुंबई प्रादेशिक हवामान विभागाच्या वैज्ञानिका शुभांगी भुते यांनी सांगितले.

हा पट्टा कायम असल्याने उत्तर कोकणातील (Konkan) मुंबई, पालघर (Palghar) भागात पाऊस राहील असे ही भुते म्हणाल्या. शिवाय महाराष्ट्रजवळ (Maharashtra) मध्य प्रदेशवर (MP) कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पाऊस झाला असल्याचे सांगण्यात आले.

शहर आणि उपनगरात सकाळपासून वातावरण ढगाळलेले होते. पहाटेपासूनच पावसाची रिपरिप सुरू हाेती. दिवसभर पावसाने उसंत घेतलेली नाही. त्यामुळे संध्याकाळी घरी परतणाऱ्या नागरिकांची दैना उडाली.

दाेन दिवसापासून ढगाळ वातावरण असून आजही पहाटेपासून सरीसरींनी पाऊस सुरू हाेता. शहर भागात 9.04 मिलिमीटर, पूर्व उपनगरात 4.31 मिलिमीटर तर पश्चिम उपनगरात 10.71 मिलिमीटर इतक्या पावसाची दिवसभरात नोंद झाली.

शहराच्या तुलनेत उपनगरात पावसाचा जोर अधिक होता. मुंबईच्या काही भागात जोराच्या सरी कोसळण्याची शक्यता असून पुढील चाेवीस तासात शहर आणि उपनगरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल.अधूनमधून पावसाच्या तीव्र सरी पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. मुंबईत पाच ठिकाणी झाडे आणि झाडांच्या फांद्या पडण्याच्या तर सहा ठिकाणी शार्ट सर्किटच्या घटना घडल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here