राज्यात ६,८५७ नवीन रुग्णांची नोंद

@maharashtracity

मुंबई: प्रतिनिधी सध्या राज्यातील मृत्यूदर २.१ % एवढा कमी असला तरी मंगळवारच्या तुलनेत बुधवारी राज्यातील कोरोना मृत्यूची नोंद अधिक होती. राज्यात बुधवारी २८६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. यात ठाणे मंडळ मध्ये सर्वाधिक म्हणजे ११२ मृत्यू नोंदविण्यात आले. तर नाशिक मंडळ १५, पुणे मंडळ ७८, कोल्हापूर मंडळ ५६, औरंगाबाद मंडळ १८, लातूर मंडळ ४, अकोला मंडळ २, नागपूर मध्ये १ असे मृत्यू नोंदविण्यात आले.

दरम्यान बुधवारी राज्यात ६,८५७ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६२,८२,९१४ झाली आहे. काल ६,१०५ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६०,६४,८५६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.५३ % एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ८२,५४५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,७३,६९,७५७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२,८२,९१४ (१३.२६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,८८,५३७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,३६४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईत दिवसभरात ४०३:

मुंबईत दिवसभरात ४०३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आता पर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७३५१६२ एवढी झाली आहे. तर ६ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आता पर्यंत १५८६० मृत्यूची नोंद करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here