प्रविणसिंह परदेशी मुख्य सचिव पदासाठीचे डार्क हॉर्स?

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे (BJP) क्रमांक दोन चे शक्तिशाली नेते आणि देशाचे गृहमंत्री (Home Minister) अमित शहा (Amit Shah) यांचा वरदहस्त लाभलेले अजोय मेहता (Ajoy Mehta)- महाराष्ट्राचे मुख्य सचिव (Chief Secretary) येत्या 30 जून रोजी विद्यमान पदावरून निवृत्त होत आहेत. पण शहा आणि राज्याचे मुख्यमंत्री (CM) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना असे वाटते की मेहता यांच्या ‘अनुभवाची’ राज्याला गरज आहे आणि म्हणूनच मेहता यांच्यासाठी ‘मुख्यमंत्र्यांचे सल्लागार’ (Advisor to CM) असे विशेष पद निर्माण करून त्यांना कॅबिनेट (cabinet rank) पदाचा दर्जा देण्याचा घाट घातला जात आहे.


मेहता यांच्या कार्यशैलीवर या राज्यातील सगळेच सत्ताधारी नाराज आहेत. अपवाद फक्त मुख्यमंत्री उद्धव टाकरे यांचा.  भारतीय प्रशासकीय सेवेतील (Indian Administrative Service) आपल्या विरोधातील अधिकाऱ्याला धडा शिकवायचा असेल तर त्याच्या डोक्यावर सेवाज्येष्ठतेत कनिष्ठ असलेल्या अधिकाऱ्याला आणून बसवायचे, ही मेहता यांनी कार्यशैली. त्यामळे वरिष्ठ सनदी अधिकारी (Bureacrats) देखील मेहता यांच्यावर नाराज आहेत. कारणे अनेक असली तरी मेहता यांनी राज्याचे प्रशासन आणि ठाकरे यांच्यावर पूर्ण पकड ठेवण्यात यश मिळवले आहे. त्याचेच फलित म्हणजे मेहता यांची नियुक्ती ‘मुख्यमंत्री यांचे सल्लागार’ या पदावर करण्यात येत आहे. तसेच त्यांना कॅबिनेट पदाचा दर्जा देण्यात येणार असल्याने मेहता यांच्यावर नाराज असलेले काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Congress-NCP) मंत्र्यांसाठी हा निर्णय म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखा ठरणार आहे.

Sanjay Kumar, ACS (Housing) additional charge of Home Department

मेहतांच्या जागी कोण?

अजोय मेहता निवृत्त झाल्यावर राज्याचे मुख्य सचिव ही जागा घेण्यासाठी संजय कुमार (Sanjay Kumar) आणि सीताराम कुंटे (Sitaram Kunte) यांच्यात स्पर्धा आहे. सेवा ज्येष्ठतेनुसार १९८४ च्या बॅचचे प्रशासकीय अधिकारी असलेले संजय कुमार यांचा या पोस्टवर नैसर्गिक हक्क आहे. ते पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांची नेमणूक मुख सचिव या पदावर झाल्यास त्यांना केवळ आठ महिण्याचा कालावधी मिळेल. मुख्य सचिवाला किमान एक वर्षाची मुदत मिळावी असे संकेत आहेत, नियम नाही. त्यामुळे नियमाला अपवाद असू शकतो. 


संजय कुमार यांची जमेची बाजू म्हणजे ते अजोय मेहता यांच्या ‘गुड बुक’ मध्ये आहेत. सनदी अधिकाऱ्यांमध्ये महाराष्ट्रीयन (Maharashtrian)विरुद्ध उत्तर भारतीय (North Indian), त्यातही दिल्ली- बिहारी (Delhi – Bihari) विरुद्ध अन्य अशी लॉबी आहे. त्यांच्यात वर्षानुवर्षे शीतयुद्ध सुरू आहे. हीच उत्तर भारतीय लॉबी आपल्या प्रांतातील सनदी अधिकाऱ्याला सांभाळून घेत असते. या जमेच्या बाजू बघता संजय कुमार यांची नियुक्ती केवळ औपचारिकता असेल, असा दावा केला जात आहे.

Sitaram Kunte, ACS (GAD)

मराठी कुंटे यांच्यासाठी सत्ताधारी आग्रही

अजोय मेहता यांना विरोध करणाऱ्या सत्तेतील लॉबीचा संजय कुमार यांना मुख्य सचिव करण्यास विरोध आहे. मेहता यांच्या विश्वासातील संजय कुमार हे मुख्य सचिव झाल्यास आपल्या विभागाला त्रास देतील, अशी भीती काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काही मंत्र्यांना वाटते. त्यासाठी मराठी सनदी अधिकारी सीताराम कुंटे यांची नियुक्ती कारवाई असा आग्रह धरला जात आहे. कुंटे हे १९८५ च्या बॅचचे आहेत. संधी मिळाल्यास कुंटे यांना नोव्हेंबर २०२१ पर्यंत म्हणजे जवळपास १६ महिण्याचा कालावधी मिळेल. 

सेनेतील एका गटाचा विरोध

कुंटे मराठी असले तरी शिवसेनेतील एका गटाचा त्यांना विरोध आहे. शिवसेना (Shiv Sena) प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या शिवाजी पार्कातील (Shivaji Park) स्मारकाला (memorial) कुंटे यांनी मुंबई महापालिका (BMC) आयुक्तपदी (Commissioner) असताना विरोध केला होता , याकडे शिवसेनेचे नेते लक्ष वेधतात. 

Praveen Singh Pardeshi, ACS (Urban Development)

प्रविणसिंह परदेशी डार्क हॉर्स?

राज्याच्या मुख सचिवपदासाठी संजय कुमार आणि सीताराम कुंटे यांच्या नावाची चर्चा सुरू असली तरी नगरविकास (Urban Development) विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि मुंबई मनपाचे माजी आयुक्त प्रविणसिंह परदेशी (Praveen Singh Pardeshi) हे डार्क हॉर्स (Dark Horse) असू शकतील, अशी चर्चा सुरू झाली आहे. परदेशी यांचे आजही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी आणि दिल्लीत सत्ताधाऱ्यांशी संबंध आहेत. याच संबंधाचा वापर करन परदेशी हे राज्याच्या मुख्य सचिवपदी विराजमान होऊ शकतात, अशी शक्यता आहे.


परदेशी हे सेवा ज्येष्ठतेत संजय कुमार याच्यापेक्षा एका वर्षाने मागे असले तरी सीताराम कुंटे याच्या पुढे आहेत. कुंटे आणि परदेशी यांची जन्मतारीख (३.११.१९६१) आणि सेवेत रुजू होण्याची दिनांक (२६.८.१९८५) एकच असली तरी रँक नुसार परदेशी हे कुंटे यांना ज्येष्ठ आहेत. ही जमेची बाजू लक्षात घेतल्यास, संजय कुमार यांचे नाव डावलले गेले तर परदेशी बाजी मारू शकतात, अशी शक्यता आहे. अर्थात परदेशी आणि मेहता यांच्यात असलेले शीतयुद्ध मुख्य सचिवपदी कोण बसेल याबाबत महत्वाची भूमिका बजावेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here