पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात पहिल्यांदाच आमदार निधी च्या माध्यमातून उभे राहणार आयसीयू आणि व्हेंटिलेटर.

मिरा-भाईंदर: संपूर्ण जगात धुमाकूळ घातलेल्या कोरोना व्हायरस शी लढण्यात सर्व ठिकाणी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्रात जिथे १५० हुन अधिक कोरोना पॉजीटव्ह रुग्ण आढळले आहेत, तिथे ह्या व्हायरस च संक्रमण वाढून आरोग्य यंत्रणेवर अधिक ताण येऊ शकतो हे पाहून राज्य सरकार विविध आव्हान आणि उपाययोजना करीत आहे. त्याच्याच एक भाग म्हणून मिरा-भाईंदरच्या आमदार गीता जैन यांनी स्वतःच्या आमदार निधीतून ३० लाख रुपये शहरातील एकमेव शासकीय, पंडित भीमसेन जोशी रुग्णालय यात अत्याधुनिक सुविधा तयार करण्यासाठी दिले आहेत.

काय म्हणाल्या गीता जैन?

  • पंडित भीमसेन जोशी रुग्णालय अत्याधुनिक करावं ही माझी प्राथमिकता आहे. जनतेने मला त्यांची काम करण्यासाठी निवडून दिलं आहे, जर मी हा निधी या रुग्णालयात आयसीयू बनवनण्यासाठी वापरते आहे तर त्यात फार काही मोठं नाही, जा जनतेचाच टॅक्स चा पैसा आहे. फक्त तो आजपर्यंत त्यांच्या साठी पूर्णपणे वापरला गेला की नाही यावर शँका उपस्थित राहते.
  • मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांचे मी आभार मानते की त्यांनी अधिवेशनात घोषणा केली होती कि यंदाच्या वर्षापासून आमदार निधी हा २ करोड पेक्षा वाढवून प्रति वर्षी ३ करोड केला आहे.
  • माझ्या महापौर काळात राज्य शासन आणि महानगरपालिका यांनी भीमसेन जोशी रुग्णालयाची नवीन इमारत उद्घाटीत केली होती. त्यानंतर मात्र रुग्णालयाच्या सेवेमध्ये म्हणावी तशी आधुनिकता नाही आली. मिरा भाईंदर शहरातील १४-१५ लाख लोकांना खरतर एकच सरकारी रुग्णालय हे अपूर आहे तरी मी राज्य शासनाकडून अधिकाधिक निधी आणून या रुग्णालयास अत्याधुनिक सिव्हिल हॉस्पिटल तयार करण्यात प्राथमिकता ठेवणार आहे, आणि तस माझं मिरा-भाईंदर कराना वचन आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणा केलेलं ५० लाख रुपयांचे निधी हे या ३० लाखांहून अधिक असतील आणि तेही कोरोना व्हायरस शी लढण्यात वापरण्यात येतील असेही यावेळी गीता जैन म्हणाल्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here