X: @milindmane70

महाड: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व शिंदे गटाच्या शुक्रवारच्या वादानंतर महाडमधील राजकीय वातावरण तापले आहे. ठाकरे गटाच्या महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल माणिकराव जगताप यांनी या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत की आमदार भरत गोगावले आहेत? असा सवाल राज्याचे गृहमंत्री फडणवीस यांना केला आहे

महाडचे शिंदे गटाचे आमदार गोगावले यांनी मागील आठवड्यात एका वृत्तवाहिनीच्या पत्रकारांशी बोलताना बाळासाहेबांच्या भावना व्यक्त करण्यासाठी तुला वर जावे लागेल, असे भाष्य केले होते. यावरून महाडमध्ये शिंदे गट व उद्धव ठाकरे गट यांच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी होऊन एकमेकांच्या अंगावर धावून जात हाणामारी करण्याचा प्रकार घडला. यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करून दोन्ही गटांना बाजूला केले

गोगावले प्रायव्हेट लिमिटेड कंपनी?

शिंदे गट व ठाकरे गटाच्या राड्यानंतर ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप यांनी महाड येथील कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन घटनेचा जाहीर निषेध केला. आमदार  गोगावले यांच्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आमच्या महिलांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार केला. त्यावेळी पोलीस यंत्रणने हस्तक्षेप का केला नाही, असा प्रश्न करून पोलिस यंत्रणेवर कोणाचा दबाव होता का? पोलीस यंत्रणा आमदार गोगावलेंच्या सांगण्यानुसार काम करत होती का? असे प्रश्न उपस्थित करीत राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना सवाल केला आहे. 

Also Read: महाड: निवडणुका जवळ येताच कोरोना जागा कसा होतो? नागरिकांमध्ये चर्चा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here