Twitter : @maharashtracity

मुंबई

विधानपरिषदेत येण्यासाठी सहज ‘पासेस मिळत नाहीत; मात्र तो पास काही जणांना १ हजार आणि ५ हजार रुपयांना मिळतो, अशी वृत्त आली आहेत, असा सनसनाटी आरोप भाजप सदस्य प्रविण दरेकर यांनी विधान परिषद सभागृहात करून एकच खळबळ उडवून दिली.  

विविध सदस्यांनी यावेळी सदस्यांना सहन कराव्या लागणाऱ्या अनेक समस्यांचा पाढा वाचला.  प्रवेश ‘पास’ मिळत नाहीत, त्यांच्या कार्यकर्त्यांना ‘पास मिळत नाहीत, उपहारगृहात बसण्यासाठी गर्दीमुळे जागा मिळत नाही, स्वच्छतागृह अस्वच्छ आहेत, तिथे पाण्याचे नळ वहात असतात वगैरे अनेक तक्रारी मांडल्या.

उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे सदस्य अनिल परब यांनी स्वच्छतागृह अत्यंत अस्वच्छ, उपहारगृहात बाहेरचेच लोक येऊन बसतात, आम्हाला अल्पोपहार करण्यासाठीही जागा मिळत नाही, काही सदस्यांनी बाहेरचे लोक आमदारांना मार्गीकेत धक्काबुक्की करतात, याकडे लक्ष वेधले.

उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी यांची गंभीर दखल घेतली.  आता अन्य कुणालाही प्रवेश पास द्यायचा नाही, असे ठरल्याने ते देणे बंद केले आहे. तरीही आमदारांना दोन ‘पास’ देऊ, ‘पास’च्या संदर्भात अपप्रकार होत असतील, तर अशांची नावे द्यावीत, असे सांगितले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here