निवडणूक झाल्यास चौथ्या जागेसाठी अटी तटीची लढत

मुंबई
राज्यपाल (Governor) नियुक्त सदस्याने मंत्री (minister) आणि खासकरून मुख्यमंत्री (CM) होऊ नये असा नियम नसला तरी संकेत आहेत. मुख्यमंत्री पदावरील व्यक्ती थेट लोकांमधून निवडून येऊ शकत नाही, असा संदेश जनतेत जाऊ शकतो. त्यामुळेच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या राज्यपाल नियुक्तीच्या प्रयत्नांवर विरोधी पक्ष भारतीय जनता पार्टीकडून (BJP) टीका केली जात होती. दरम्यान, राज्यपाल भगत सिंग कोशयारी (Bhagat Singh Koshyari) यांनी निवडणूक आयोगाला (Election Commission of India – ECI) केलेल्या विनंतीनुसार विधानसभा (assembly) विधानसभा मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या आणि आता रिक्त झालेल्या ९ जागेसाठी लगेचच निवडणूक घोषित झाली तर पुढील २१ दिवसात उद्धव ठाकरे हे विधानसभा मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून जाऊ शकतील.

उद्धव ठाकरे यांना येत्या २८ मे तारखेपर्यंत कधीही विधिमंडळाच्या दोन्हीपैकी एका सदनाचे सदस्य म्हणून निवडून येणे क्रमप्राप्त आहे. उपमुख्यमंत्री (DCM) अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या दोन्ही बैठकीत ठाकरे यांना राज्यपाल यांना असलेल्या अधिकार कोट्यातून विधान परिषदेचे (Council) सदस्य म्हणून नामनियुक्त करावे, अशी शिफारस करण्यात आली आहे. परंतु, राज्यपाल यांनी आज, दि ३० एप्रिल रोजी दुपारपर्यंत निर्णय न घेतल्याने शिवसेना (Shiv Sena) शिष्टमंडळाने राज्यपाल कोशयारी यांची भेट घेतली. त्यानंतर संध्याकाळी राजभवन (Raj Bhavan) येथून प्रसिद्ध झालेल्या पत्रकात राज्यपाल यांनी ९ रिक्त जागेसाठी निवडणूक आयोगाने तातडीने निवडणूक कार्यक्रम घोषित करावा, अशी मागणी केल्याचे नमूद केले आहे.

विधानसभा मतदार संघातून निवडून आलेले ९ सदस्य दिनांक २४ एप्रिल रोजी निवृत्त झाले आहेत. त्यात भाजपचे ३, राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) -३ काँग्रेस (Congress) पक्षाचे २ तर शिवसेनेच्या एका सदस्याचा समावेश आहे. राज्यपाल यांनी केलेली विनंती निवडणूक आयोगाने लगेच मान्य केली तर २१ दिवसात निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल, अशी माहिती विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनी TheNews21  शी बोलताना दिली. 

“जेवढ्या जागा, त्यापेक्षा जास्त उमेदवार निवडणूक (election) रिंगणात राहिले, तर निवडणूक घ्यावी लागेल. ही प्रक्रिया २१ दिवसात पूर्ण होते.  नामांकन माघारीनंतर जेवढ्या जागेसाठी निवडणूक आहे, तेवढेच उमेदवार निवडणूक रिंगणात असतील तर त्याच दिवशी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या परवानगीने निवडणूक बिनविरोध झाल्याचे घोषित केले जाते. त्यामुळे त्यानंतरच्या सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याची किंवा घोषित कार्यक्रमानुसार निवडणूक निकालाच्या तारखेपर्यंत निकाल जाहीर करण्याची आवश्यकता राहत नाही,” असे श्री भागवत यांनी सांगितले.

विधानसभेत २८८ सदस्य आहेत. ९ जागेसाठी निवडणूक होत असल्याने एक उमेदवार निवडून येण्यासाठी २८.८ म्हणजे २९ मतांचा कोटा असेल. {२८८/(९+१) = २८.८}. विधानसभेत भाजपचे १०५ सदस्य आहेत, शिवसेना – ५६, राष्ट्रवादी काँग्रेस – ५४ तर काँग्रेसचे ४४ सदस्य आहेत. पक्षीय बलाबल बघता, भाजपचे ३ सदस्य सहज निवडून येतील. बच्चू कडू (Bachcha Kadu) यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या दोन सदस्यांचा आणि क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या एका सदस्याचा शिवसेनेला पाठिंबा असल्याने सेनेचे २ उमेदवार सहज निवडून येतील. राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांचा दुसरा उमेदवार निवडून येण्यासाठी अतिरिक्त चार मतांची गरज असेल. शेतकरी कामगार पक्षाचा एक सदस्य आणि कॉंग्रेसकडील अतिरिक्त मताच्या मदतीने राष्ट्रवादीचा दुसरा उमेदवार निवडून येईल.

काँग्रेसचे ४३ सदस्य असल्याने दुसऱ्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी काँग्रेसला अतिरिक्त किमान १५ मतांची गरज असेल आणि निवडणूक झालीच तर घोडेबाजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे काँग्रेस दुसऱ्या उमेदवाराचा आग्रह सोडून देण्याची शक्यता आहे.

भाजपचे तीन उमेदवार निवडून आल्यावर पक्षाकडे अतिरिक्त १८ मते शिल्लक राहतात. चौथ्या उमेदवाराला निवडून आणायचे झाल्यास भाजपला अतिरिक्त ११ मतांची गरज भासेल. विरोधी पक्ष नेते (LoP) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यापूर्वी केलेल्या दाव्यानुसार त्यांना ९ अपक्ष सदस्यांचा पाठिंबा आहे. त्यामुळे थोडे प्रयत्न केल्यास भाजपचा चौथा उमेदवार सहज निवडून येऊ शकेल, असा दावा राजकीय निरीक्षकाने केला आहे.

असे झाल्यास भाजप आणि शिवसेनेचा एक अतिरिक्त सदस्य विधान परिषदेत बसेल. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँगेसची एक जागा कमी होईल. घोडेबाजार टाळण्यासाठी सर्व पक्ष मिळून ९ जागेसाठी होणारी निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता जास्त असेल, असे मत या निरीक्षकाने नोंदवले. अर्थात त्यासाठी निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम घोषित करणे अपेक्षित आहे. 
याच निवडणुकीच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांचा परिषदेवर निवडून जाण्याचा मार्ग मोकळा होईल. निर्धारित कालावधीत म्हणजे २८ मे च्या आधी ठाकरे यांची निवड होऊन राजकीय पेचप्रसंगातून महाराष्ट्राची सुटका होईल, असे मत राजकीय निरीक्षकाने नोंदवले.

रिक्त झालेल्या जागा

भाजप – ३, राष्ट्रवादी काँग्रेस – ३, काँग्रेस – २, शिवसेना – १

निवृत्त झालेले सदस्यशिवसेना

१. डॉ नीलम गोऱ्हे (उपसभापती, विधान परिषद)
भाजप

१. श्रीमती स्मिता वाघ, २. अरुण अडसड, ३. पृथ्वीराज देशमुख

राष्ट्रवादी काँग्रेस

१. हेमंत टकले, २. आनंद ठाकूर, ३. किरण पावसकर

काँग्रेस

१. हरिभाऊ राठोड, २. चंद्रकांत रघुवंशी (निवडणूक आधी राजीनामा दिला आहे)

पक्षीय बलाबल

भाजप – १०५, शिवसेना – ५६, राष्ट्रवादी काँग्रेस – ५४, काँग्रेस – ४४, बहुजन विकास आघाडी – ३, समाजवादी पार्टी – २, एम आय एम – २, प्रहार जनशक्ती – २, मनसे – १, माकप – १, शेतकरी कामगार पक्ष – १, स्वाभिमानी पक्ष – १, राष्ट्रीय समाज पक्ष – १, जनसुराज्य पक्ष – १, क्रांतिकारी शेतकरी पक्ष – १, अपक्ष – १३

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here