Twitter : @vivekbhavsar

मुंबई

शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट आणि शिव प्रतिष्ठान या कडव्या हिंदुत्ववादी संघटनेचे संस्थापक मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे या दोघांनी केलेल्या वादग्रस्त व्यक्तव्याने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. संभाजी भिडे यांची अर्धी मिशी कापून आणल्यास एक लाख रुपये बक्षीस दिले जाईल अशी घोषणा समता परिषदेचे जालना जिल्हाध्यक्ष नवनाथ वाघमारे यांनी केले आहे. तर आमदार संजय शिरसाट यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) राज्यसभा सदस्य प्रियंका चतुर्वेदी यांच्याबद्दल बोलताना जीभ घसरली. महिलेबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे आमदार शिरसाट यांच्याविरुद्ध रस्त्यावर आणि समाजमाध्यमावर रण पेटले आहे.

महात्मा गांधी यांचे वडील मुस्लिम होते असे वादग्रस्त विधान करून दोन दिवस ही जात नाही तोच संभाजी भिडे यांनी भाविकांचे श्रद्धास्थान असलेले शिर्डीचे साईबाबा तसेच महात्मा फुले आणि राजाराम मोहन रॉय या सारख्या समाज सुधारकांवर अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केले. यामुळे संभाजी भिडे विरोधात सर्वत्र तीव्र प्रतिक्रिया ऊमटत आहेत. बुलढाणा येथील जाहीर कार्यक्रमास जाताना भिडे यांना लपून छापून जावे लगेले, तरीही वंचित बहुजन आघाडी आणि ऑल इंडिया पँथरच्या कार्यकर्त्यांनी काले झेंडे दाखवून सभास्थळी राडा केला.

(बुलढाणा येथे संभाजी भिडे याला वंचित बहुजन आघाडी आणि पॅंथर कडून काले झेंडे दाखवून निषेध करण्यात आला )

पृथ्वीराज चव्हाण आणि यशोमति ठाकूर यांनी संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी केल्याने कॉँग्रेसच्या या दोन्ही नेत्यानं जीवे मारण्याची धमकी आली आहे. भिडे विरोधात आपला लढा असाच सुरू राहील, असे यशोमति ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे. तर चव्हाण यांनी संभाजी भिडे याच्या संघटनेला आर्थिक रसद कोण पुरवितो असा प्रश्न उपस्थित करून भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे नाव न घेता त्यांच्याकडे अंगुलीनिर्देश केला आहे.

महात्मा गांधी हे पूजनीय असून त्यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केलेले खपवून घेतले जाणार नाही, असे राज्याचे गृह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले असले तरी त्यांच्याच पक्षाचे अमरावतीचे खासदार आणि राज्य सभस सदस्य डॉ अनिल बोंडे यांनी मात्र संभाजी भिडे याची पाठराखण केली आहे.

याच अमरावती जिल्ह्यातील अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी संभाजी भिडे याची नांगी ठेचली पाहिजे अशा तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.

दुसरीकडे संजय शिरसाट यांनी प्रियंका चतुर्वेदी या सुंदर असल्याने त्यांना आदित्य ठाकरे यांनी राज्यसभा सदस्य केले असे वक्तव्य केले आहे. शिरसाट यांच्या या वक्तव्यावर प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विट करून उत्तर दिले आहे. दरम्यान, नेटकरांनी आमदार शिरसाट यांची ट्विटर वर यथेच्छ धुलाई केली आहे.

दरम्यान, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे वाक्य आपल्या तोंडी टाकण्यात आल्याचा दावा शिवसेना आमदार संजय शिरसाठ यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here