मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra) शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-कॉंग्रेस (Shiv Sena – Congress- NCP) हे महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकार स्थापन झाल्यावर स्थानिक स्वराज्य संस्थेतही भारतीय जनता (BJP) पक्षाला सत्तेपासून दूर राखण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र आली आणि नागपूर (Nagpur), कोल्हापूरसह (Kolhapur) राज्यातील अन्य जिल्हा परिषद (ZP) निवडणुकीत भाजपला रोखण्यात महाविकास आघाडीला यश मिळाले . हाच कित्ता राज्यात लवकरच होणाऱ्या २० जिल्हा सहकारी बँकेच्या (DCC bank) निवडणुकीत राबवला जाणार आहे. यातून गैरव्यवहाराचे आरोप असलेली मुंबई (Mumbai bank) सहकारी बँकेचाही समावेश आहे. या बँकेवर गेली अनेक वर्षे सत्ता राखून असलेले प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांची सत्ता उलथवून टाकण्यात महाविहास आघाडी यशस्वी होईल का, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागून आहे.

विधान परिषदेतील (Upper House) विरोधी पक्ष नेते (LoP) आणि माजी मुख्यमंत्री (former CM) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) याचे भारतीय जनता पक्षातील विश्वासू सहकारी प्रवीण दरेकर हे मुंबई बँकेचे अध्यक्ष आहेत. दरेकर यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा ठपका नाबार्ड (NABARD) या संस्थेने लेखा परीक्षणानंतर ठेवला होता. नाबार्डने मार्च २०१८ मध्ये सादर केलेल्या अहवालात, बँकेने कर्ज मंजूरी प्रकरणात योग्य ती खबरदारी घेतली नाही, ४९ सोसायटीला दिलेल्या कर्जाची वसुली केली नाही आणि त्यातून सुमारे ९७.८७ कोटी रुपयांचा घोटाळा केला,  बँकेची अनुत्पादक मालमत्ता (NPA) रु १६९.४० कोटी म्हणजे एकूण मालमत्तेच्या १० टक्के असणे असे निष्कर्ष काढले होते. नाबार्डच्या अहवालानुसार मुंबई बँकेत झालेले आर्थिक गैर व्यवस्थापन हे रु. १११.९३  कोटीचे आहे.

याच मुद्द्यांच्या आधारे मुंबईत सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि काँग्रेसने एकत्र येऊन दरेकर यांच्याविराधात आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. सेनेनेही त्यांच्या ताब्यातील सेवा सहकारी आणि मजूर संस्थेतील अधिकृत मतदाराच्या नावाचा ठराव करून ते  प्राधिकरणाकडे सादर केले आहे. तर काँग्रेसने सेवा सहकारी संस्थांवर लक्ष केंद्रित केले आहे. भाजपची ‘रसद’ संपवण्यासाठी सत्ताधारी तिन्ही पक्ष एकत्र आल्याने मुंबई बँकेची निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे.

प्रवीण दरेकर यांनी पूर्ण 21 जागा त्यांच्याच पॅनेलच्या येतील अशा विश्वास व्यक्त करतांना शिवसेनेचे विद्यमान तीन सफसय देखील यावेळी पराभूत होतील, असा विश्वास व्यक्त केला.दरेकर म्हणाले, “मतदार ठराव सादर करण्यासाठी अजून चार दिवस आहेत. सेनेची तयारी नाही आणि आम्ही आघाडी घेतली आहे. शरद पवार यांनी या मुंबई बँक निवडणुकीत लक्ष घातले असले तरी आमचेच सर्व संचालक निवडून येतील.”

शिवसेनेच्या महिला बचत गट फेडरेशनच्या अध्यक्ष आणि मुंबई बँकेच्या माजी संचालक संजना घाडी (Sanjana Ghadi) यांनी महाविकास आघाडी यावेळी प्रवीण दरेकर यांना सत्तेतून बाहेर घालावेल, असा विश्वास व्यक्त केला.

सेनेची गृहनिर्माण सहकारी संस्था, सहकारी बँक, पतसंस्था तसेच महिला बचत गट या मतदारसंघावर पकड आहे. तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याही ताब्यात संस्था आहेत. या भांडवलावर भाजप आणि दरेकर यांचे मुंबई बँकेवरील वर्चस्व मोडीत काढू, असा विश्वास संजना घाडी यांनी व्यक्त केला.

रम्यान, राज्यातील २० जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह ४६ हजार ४३० सहकारी संस्थांच्या निवडणूक या वर्षात होणार आहे. या निवडणूका घेण्याची तयारी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने सूरु केली आहे. तत्कालीन कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने सन २०१३ मध्ये राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाची स्थापना केली होती. त्यानंतर दि ११ एप्रिल २०१४ रोजी महाराष्ट्र सहकार निवडणूक (समिती) कायदा अमलात आला. तेव्हापासून सहकारी संस्थांच्या निवडणूक या प्राधिकरणामार्फत घेतल्या जातात.  प्राधिकरणाकडून मिळालेल्या माहितीनुसार दि ११ मार्च रोजी बँकेची अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली जाईल

सन २०१८ या वर्षात विविध कारणांमुळे १६ हजार ३७६ सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रलंबित आहेत. दि. ३१ डिसेंबर २०१९ या तारखेपर्यंत पर्यत ३० हजार ५४ संस्था निवडणुकीस पात्र होत्या.  ‘अ’ वर्गातील २२२ संस्था, ‘ब’ वर्गातील १३,४४९ संस्था, ‘क’ वर्गातील १४९२० संस्था तर ‘ड’ वर्गातील १७,८३३ अशा एकूण ४६,४३० संस्था निवडणुकीस पात्र आहेत.

या जिल्हा बँकांची होणार निवडणूक

राज्यातील मुंबई, ठाणे (Thane), पुणे (Pune), सोलापूर (Solapur), गडचिरोली (Gadchiroli), औरंगाबाद (Aurangabad), बीड (Beed), लातूर (Latur), अकोला (Akola), परभणी (Parbhani), नांदेड (Nanded), जळगाव (Jalgaon),  रत्नागिरी (Ratnagiri), धुळे-नंदुरबार (Dhule-Nandurbar), अहमदनगर (Ahmednagar), सिंधुदुर्ग (Sindhudurg), उस्मानाबाद (Osmanabad), सातारा (Satara), नाशिक (Nashik)आणि कोल्हापूर (Kolhapur) या जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची मुदत दि २६ एप्रिल ते २९ मे २०२० या कालावधीत संपत आहे. मतदार यादी तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या मतदाराच्या नावाचा ठराव दि ३१ जानेवारीपर्यंत दाखल करण्याच्या सूचना राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण यांच्याकडून या आधीच देण्यात आल्या आहेत. त्यानंतर प्रारूप मतदार यादी तयार केली जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here