राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया देताना मतदारांनी सत्तेचा उन्माद नाकारला असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

या निवडणुकीत दिसलं की भाजप – सेनेच्या (BJP-Shiv Sena) लोकांचा सत्तेचा उन्माद जनतेला पसंद पडला नाही. मुळात जमिनीवर पाय ठेवून चालले की, त्यांचे स्वागत होते. परंतु त्यांनी सीमा ओलांडली होती अशी जोरदार टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress Party – NCP) राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला ase सांगण्यात आले होते २२० पार मात्र लोकांनी ते स्वीकारलेले नाही. लोकांनी निर्णय दिला आहे, असा टोला भाजपाला लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेसने जनतेने दिलेला निर्णय (mandate) विनम्रपणे स्वीकारला आहे तो आम्ही स्वीकारतो आहे. महाआघाडीतील सर्व पक्षांनी मनापासून परस्परांना सहकार्य केले. राष्ट्रवादी (NCP) व काँग्रेस (Congress) यांनी प्रामाणिक प्रयत्न केला त्याबद्दल सर्वांचे शरद पवार यांनी आभार मानले.

निवडणूकीत एवढं लक्षात आलं की, ज्यांनी पक्षांतर केले त्या लोकांना पाठिंबा जनतेने दिलेला नाही.
जनतेने त्यांच्याविरोधी भूमिका घेतली. सातारा (Satara) ही लोकसभेची (Lok Sabha) एकच जागा होती. त्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सातारच्या गादीबद्दल सर्वांना आदर होता. परंतु त्या गादीशी इमान ठेवले नाही तर काय होते हे लोकांनी दाखवून दिले, असे सांगतानाच आमचे उमेदवार श्रीनिवास पाटील (Srinivas Patil) यांना जनतेने चांगले मताधिक्य दिले. त्याबद्दल सातारकरांचे आभार मानले. परंतु मी तिथे जावून सातारकर जनतेचे आभार मानणार असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

उद्यापासून दिवाळी सुरु होत आहे.त्यामुळे दिवाळीनंतर आमची बैठक होईल.त्यानंतर मित्रपक्षांसोबतही होईल. एकंदर जनमत पहाता पक्ष उभारणीची काळजी घेणे, शिवाय नव्या पिढीला बरोबर घेऊन तो अजुन व्यापक करणार आहे. राज्यपातळीवर ठिकठिकाणी जावून प्रयत्न करणार आहे असेही शरद पवार म्हणाले.

आम्ही आमचा पक्ष मित्रपक्ष यांना घेवून काम करणार आहोत. जनतेने आम्हाला विरोधी पक्षात बसवलं आहे. आम्ही त्याचा स्वीकार करतो असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. देशाचे पंतप्रधान (Prime Minister), गृहमंत्री (Home Minister) यांनी निवडणूकीच्या दृष्टीने महाराष्ट्राचे (Maharashtra) दर्शन घेतले त्याबद्दल त्यांना शरद पवार यांनी धन्यवाद दिले.

आघाडीचा धर्म कॉंग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे पाळला आहे असे शरद पवार यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here