@maharashtracity

आज आणखी एकाची भर पडली

मुंबई: जगभरातील २३ देशांमध्ये आढळून येणाऱ्या ओमिक्रॉनच्या अटकावासाठी पालिकेकडून आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कोरोना तपासणी सुरु केली आहे. या तपासणीत शुक्रवारी उशिरा पॉझिटिव्ह एका रुग्णाची भर पडली. आता १० प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्याचे पालिका आरोग्य कार्यकारी अधिकारी मंगला गोमारे यांनी सांगितले. या सर्व प्रवाशांच्या प्रवासाचा इतिहास जाणून घेतला जात आहे.

दिनांक २ डिसेंबर पर्यंत अमिक्रोन (Omicron) प्रभावित देशांमधून ३ हजार १३६ प्रवाशी आले. यातील २ हजार १४९ जणांची कोविड टेस्ट (Covid test) करण्यात आली. पॉझिटिव्ह रुग्णात आज एकाची भर पडली. या पोझिटीव्ह रुग्णात ४ जण सहसंपर्कातून असल्याचे सांगण्यात आले.

९ रुग्णांपैकी केवळ एकच रुग्ण आठवड्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) प्रवास करुन मुंबईत (Mumbai) परतला आहे. तर ३९ वर्षीय तरुण २५ नोव्हेंबर रोज मुंबईत आला आहे. ५ रुग्ण लंडनहून (London) मुंबईत आलेत.

तसेच नोव्हेंबर महिन्यापासून लंडनहून २१ वर्षीय तरुण १० नोव्हेंबरला, २५ वर्षीय तरुण १ डिसेंबरला, ६६ वर्षीय वृद्ध १७ नोव्हेंबरला, ३४ वर्षीय १३ नोव्हेंबरला तर ४५ वर्षीय २ डिसेंबरला गुरुवारी मुंबईत आलेत. यात आज सांगण्यात आलेल्या प्रवाशांमध्ये १६ वर्षाची मुलगी पॅरिसहून (Paris) २५ नोव्हेंबर रोजी आली. तर दुसरी ४१ व्यक्ती २८ नोव्हेंबर रोजी स्पेनहून (Spain) आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here