@maharashtracity

मुंबई: राज्यात शुक्रवारी १३३८ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,०९,२९२ झाली आहे. आज १,५८४ रुग्ण बरे होऊन घरी गेले.

राज्यात आजपर्यंत एकूण ६४,४७,०३८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.५५% एवढे झाले आहे.

राज्यात आज रोजी एकूण १८,४६५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत

ALSO READ: मुंबई महापालिकेत भंगार घोटाळा

दरम्यान, राज्यात काल ३६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,२४,३९,९०० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,०९,२९२(१०.५९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १,६८,३३८ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ९०८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईत दिवसभरात ३३०

मुंबईत दिवसभरात ३३० नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७५६१३४ एवढी झाली आहे. तर ६ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आता पर्यंत १६२४१ मृत्यूची नोंद करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here