@maharashtracity

मुंबई: राज्यात सोमवारी १,४८५ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची (corona patients) एकूण संख्या ६५,९३,१८२ झाली आहे.

काल २,०७८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर राज्यात आजपर्यंत एकूण ६४,२१,७५६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.४% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण २८,००८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान, राज्यात सोमवारी २७ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.

Also Read: पालिकेकडून लसीकरण ऑन व्हील उपक्रम

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,११,१६,३५३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,९३,१८२(१०.७९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात २,०८,६१३ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ९६१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईत दिवसभरात ३७१

मुंबईत दिवसभरात ३७१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७५२०३० एवढी झाली आहे. तर ४ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आतापर्यंत १६१८४ मृत्यूची नोंद करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here