@maharashtracity

राज्यात २,८७६ नवीन रुग्ण

मुंबई: मुंबईत दिवसभरात २४ तासात १९७ कोरोना रुग्णांची भर पडली आहे. मंगळवारी ४२७ रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तर बुधवारी तब्बल ६२४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आल्याने मुंबई पुन्हा एकदा पाचशे पार गेल्याचे दिसून आले.

मुंबईत आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७,४६,७०३ एवढी झाली असून बुधवारी दिवसभरात ७ कोरोना बाधित रुग्णांचा (corona patients) मृत्यू नोंदविण्यात आले. आज आतापर्यंत १६,१३६ मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान राज्यात बुधवारी २,८७६ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यतील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६५,६७,७९१ झाली आहे. काल २,७६३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर राज्यात आजपर्यंत एकूण ६३,९१,६६२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले.

यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३२ टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ३३,१८१ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तसेच राज्यात बुधवारी ९० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली.

सध्या राज्यातील मृत्युदर २.१२ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,९६,१९,६३७ प्रयोगशाळा नमुन्यापैकी ६५,६७,७९१ (११.०२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तर सध्या राज्यात २,३९,७६० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १,४१६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे सांगाण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here