@maharashtracity

महाड: महाड तालुक्यात आज दिवसभरात विविध गावात घडलेल्या घटनांत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. रेड्याच्या हल्ल्यात वृद्धाचा तर झाडाची फांदी पडून मृत्यू झाला आहे.

महाड तालुक्यातील सापे गावात आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास आपली गुरे चरावयास घेऊन जात असताना त्यांच्या कळपातील एका रेड्याने अचानक हल्ला केल्याने भिकू सुडकोजी रसाळ हे जबरी जखमी झाले. जखमी अवस्थेत भिकू रसाळ यांना महाड मध्ये उपचारासाठी आणत असतानाच मृत्यू झाला.

Also Read: धुळ्यात न्यायाधीशांकडे घरफोडी!

तर दुसऱ्या घटनेत कावळे गावातील मधुकर येरूनकर हे मंजूर घरकुलाच्या कामासाठी नारळाचे झाडाच्या झावळ्या तोडत असताना नारळाच्या झाडाखालून जाणाऱ्या पांडुरंग धोंडू पवार यांच्यावर झाड पडल्याने पांडुरंग पवार हे जागीच मयत झाले आहेत.

या दोन्ही घटनांची नोंद महाड तालुका पोलीस ठाण्यात (Mahad Police) केली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here