@maharashtracity

२९१ निवासी डॉक्टरांना कोरोनाची बाधा

मुंबई: राज्यासह मुंबईतील सार्वजनिक रुग्णालयातील कोरोनाबाधित डॉक्टरांची (corona affected doctors) संख्या पुन्हा वाढू लागली आहे.

राज्यात मंगळवारी १७० निवासी डॉक्टरांना (Resident doctors) कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. यात बुधवारी वाढ होऊन ही संख्या २९१ वर पोहोचली आहे. यात मुंबईतील २६५ बाधित निवासी डॉक्टरांचा समावेश असल्याचे मार्ड (MARD) संघटनेकडून सांगण्यात आले.

कोरोनाबाधित डॉक्टरांना होम आयसोलेशन (Home Isolation) सुचविण्यात येत आहे. मात्र डॉक्टरांच्या वाढत्या संख्येने रूग्ण सेवेवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान, राज्यातील जेजे रुग्णालय ७३, केईएम- ६०, सायन- ८०, नायर -४५, कूपर ७, ठाणे- कळवा शासकीय रुग्णालय -८, धुळे शासकीय रुग्णालय -८, नागपूर आयजीएम- १, बीजे मेडिकल पुणे- ५, मिरज शासकीय रुग्णालय- २, लातूर शासकीय रुग्णालय-१, नायरमधील ४५ डॉक्टरांचा बाधितांमध्ये समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here