मुंबईत दिवसभरात ६१९ बाधित

@maharashtracity

मुंबई: राज्यात बुधवारी  ८,६०२ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६१,८१,२४७  झाली आहे. आज ६,०६७  रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ५९,४४,८०१  कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.१७ % एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण १,०६,७६४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

 राज्यात बुधवारी १७०  कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०४ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या  ४,४६,०९,२७६ प्रयोगशाळा  नमुन्यांपैकी ६१,८१,२४७ (१३.८६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.सध्या राज्यात ५,८०,७७१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,३०९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईत दिवसभरात ६१९

मुंबईत (Mumbai) दिवसभरात ६१९ नव्या कोरोना रुग्णांची (corona update) नोंद करण्यात आली. आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७२९२६३ एवढी झाली आहे. तर १० कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आता पर्यंत १५६५४ मृत्यूची नोंद करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here