@maharashtracity

टाटा मेमोरियल रुग्णालयाचा उपक्रम

मुंबई: टाटा मेमोरियल सेंटर (Tata Memorial Central) कडून डॉक्टरांसाठी ‘सेंटर फॉर स्ट्रेंगनिंग कॉज ऑफ डेथ डेटा’ हे ऑनलाईन प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. या शिक्षणामुळे डॉक्टरांना मृत्यूचे योग्य कारण समजण्यास मदत होणार आहे. यातून मृत्यूच्या कारणांचे दुवे शिकविले जाणार आहेत. त्यामुळे रोगाची कारणे, होणारी मृत्यूसंख्या अशी मृत्यू विश्लेषणात्मक माहिती सरकारी यंत्रणेला मिळण्यास मदत होणार आहे.

टाटा मेमोरियल सेंटरचे कॅन्सर एपिडेमिओलॉजी सेंटरचे डॉक्टर डॉ.राजेश दीक्षित म्हणाले की, बहुतांश रूग्ण सहव्याधी असतात. अशा वेळी नेमक्या कोणत्या आजाराने रूग्ण दगावला हे ठरविणे डॉक्टरांना कठीण होते. तसेच रोगाचे योग्य निकष लावणे शक्य होत नाही. यामुळे आरोग्य यंत्रणांना डेटा तयार करणे कठीण होते. हे सर्व लक्षात घेऊन टाटाने हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे.

‘सेंटर फॉर स्ट्रेन्थनिंग कॉज ऑफ डेथ डेटा’च्या माध्यमातून, टाटा हॉस्पिटल तज्ञांच्या माध्यमातून डॉक्टरांना’ मृत्यूचे नेमके कारण ‘समजून ते लिहिण्यासाठी प्रशिक्षण देईल. हा अभ्यासक्रम ‘ओम्निक्यूरिस’ या ऑनलाइन व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. ४ तासांचा अभ्यासक्रम ११ मॉड्यूलमध्ये विभागलेला आहे. प्रत्येक मॉड्यूलचा कालावधी २० मिनिटे आहे. या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा सर्वात मोठा फायदा म्हणजे डॉक्टरांना त्यांच्या वेळेच्या सोयीनुसार हे प्रशिक्षण घेता येणार आहे.

सध्या हा अभ्यासक्रम इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे आणि लवकरच मराठी आणि हिंदी भाषेत उपलब्ध करून दिला जाईल. या डिजिटायझ्ड एज्युकेशन मॉड्यूलचा प्राथमिक उद्देश ग्रामीण किंवा शहरी भागातील चिकित्सकांची योग्यता सुधारणे असून यामुळे वेळेवर ‘मृत्यूचे योग्य कारण’ प्रमाणपत्र देणे डॉक्टरांना शक्य होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here