@maharashtracity

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे आदेश

मुंबई: केंद्राकडून महाराष्ट्राला महिन्याकाठी १ कोटी ७५ लाख लसीचे डोस मिळत आहे. लस मिळण्याची ही गती चांगली असून राज्यातील लसीकरणाचा वेग ही वाढवला पाहिजे, (increase speed of vaccination) अशी सूचना राज्य लसीकरण नोडल अधिकारी यांना करण्यात आली असल्याचे राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी सांगितले.

राज्यात दररोज १५ लाख लसीकरण झाले पाहिजेत, असे आदेश यावेळी देण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, राज्यातील ६५ टक्के जनतेला पहिला डोस देण्यात आला असून दुसरा डोस ३० ते ३५ टक्के लोकसंख्येला देण्यात आला आहे. मात्र, हीच टक्केवारी ७५ हून अधिक गेल्यास राज्यात बऱ्या पैकी हर्ड इम्युनिटी तयार होईल. हर्ड इम्युनिटी (herd immunity) तयार झाल्यास संसर्ग झाला तरी रुग्णाच्या जीविताला हानी उद्भवणार नाही असे ही टोपे म्हणाले.

राज्याला महिन्याकाठी १ कोटी ७५ लाख लसीचे डोस मिळत आहेत. तर ६ हजार सेशन दररोज होत आहेत. एका सेशन मध्ये २०० जणांना लस दिली जात आहे. त्यामुळे राज्यात रोज १० जणांना लस देण्याचा वेग आहे. मात्र हा वेग १५ लाखावर गेला पाहिजे. यातून हर्ड इम्युनिटी तयार होऊन लोकसंख्या सुरक्षित होईल.

तसेच यामुळे तिसऱ्या लाटेचा प्रभाव राहणार नाही. संसर्ग झाला तरी आयसीयू किंवा ऑक्सिजनची गरज कमी होऊ शकते असे सांगण्यात आले.

तसेच लहान मुलांसाठी आयुर्वेदिक इम्युनिटी बूस्टर वाटप होणार असेल तर त्याचे स्वागतच असेल असे टोपे यांनी सांगितले. जर त्या बुस्टरची तपासणी निकषावर झाली असल्यास भारतीय औषध पद्धतीला प्रोत्साहन देण्यासाठी लोकांनी ते नक्की घ्यावे असे ही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here