@maharashtracity

चार शहरांत सक्रिय रुग्ण उल्लेखनीय

पुणे पहिल्या तर मुंबई दुसऱ्या क्रमांकावर

मुंबई: सोमवारी राज्यातील कारोना रुग्णसंख्येचा (Corona Active Patient) आलेख उतरत असल्याचे दिसून आले. कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळत असताना राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात घटत असल्याचे देखील आकडेवारीवरुन समोर येत आहे. तुरळक जिल्ह्यात अद्याप नाममात्र सक्रिय रुग्ण तग धरुन असून सात जिल्ह्यात एक अंकी सक्रिय रुग्ण संख्या असल्याचे आकडेवारी सांगत. मात्र मुंबई (Mumbai) अद्यापही सक्रिय रुग्णसंख्येत दुसऱ्या क्रमांकावर असून पुणे (Pune) पहिल्या क्रमांकावर आहे.

नुकतेच गणेशोत्सव (Ganesh Festival) , नवरात्रोत्सव ( Navratri Festival ) सारखे गर्दी वाढवणारे उत्सव येऊन गेले. दिवाळी ( Diwali Festival) तोंडावर असून बाहेर कामानिमित्त जाणे तसेच बाजारातील लोकांचा बऱ्यापैकी मुक्त संचार सुरु आहे. शाळा महाविद्यालये (School-colleges) देखील सुरु झाल्या असून नियमित होण्याच्या मार्गावर आहेत.

सण उत्सव सुरु झाल्यापासून २१ दिवसाच्या कालावधी नंतर तसेच शाळा महाविद्यालये सुरु झाल्यापासून संसर्गाचा (Corona infection) उद्रेक दिसून येत नाही. ही संसर्ग नियंत्रणात येत असल्याचे द्योतक असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. मात्र कोविड वर्तणूक पाळण्यावर भर देण्यास वारंवार सुचवले जात आहे.

दरम्यान राज्यात २६ ऑगस्ट रोजी राज्यात ५० हजार ३९३ सक्रिय रुग्ण असल्याची नोंद आहे. तर यानंतर एक महिना उलटून म्हणजेच २६ सप्टेंबर रोजी राज्यात ३७ हजार ८६० एवढी सक्रिय रुग्ण संख्या नोंद करण्यात आली. तर परवाच्या २५ ऑक्टोबर रोजी २३ हजार १८४ सक्रिय रुग्ण संख्या नोंद करण्यात आली होती. या तीन महिनाभराच्या कालावधीत सक्रिय रुग्णसंख्या निम्याने कमी झाली असल्याचे समोर येत आहे. तर राज्यात सोमवारी ८८९ नवीन रुग्णांची नोंद ही पहिल्या लाटेनंतर सर्वात कमी रुग्ण नोंद असल्याचे सांगण्यात येत आहे.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, सोमवारी १४ जिल्ह्यामध्ये दैनंदिन रूग्णांची संख्या शून्य तर १२ जिल्ह्यांमध्ये दैनंदिन रुग्ण एक अंकी होती. तर राज्यात मुंबई, ठाणे ( Thane), पुणे व रत्नागिरी (Ratnagiri) वगळता एकाही जिल्ह्यात एकही मृत्यू नसल्याचे सांगण्यात आले.

सक्रिय रुग्णसंख्येत मुंबई दुसऱ्या क्रमांकावर

राज्यात अशी स्थिती असताना चार शहरांमध्ये मात्र सक्रिय रुग्णांची संख्या उल्लेखनीय असल्याचे दिसून येते. यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण पुण्यात आहेत. या ठिकाणी ६ हजार ९२३ रुग्ण असून पुणे पहिल्या क्रमांकावर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर मुंबई असून मुंबईत ४ हजार ९७९ इतके सक्रिय रुग्ण आहेत. तर ठाण्यात (Thane) ३ हजार ४३१ तसेच अहमदनगर (Ahmednagar) येथे २ हजार २५५ सक्रिय रुग्ण आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here