@maharashtracity

धुळे: मालेगाव (Malegaon) येथील उपमाहिती कार्यालयातील सहाय्यक माहिती अधिकारी (Asst DIO) मनोहर भगवान पाटील (वय 45) यांचे गुरुवारी रात्री मालेगावहून धुळ्याकडे (Dhule) येताना दुचाकीला अपघात (accident) झाल्याने निधन झाले. त्यांच्या अकाली मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

शहरातील कालिकानगरमध्ये वास्तव्यास असलेले मनोहर पाटील सध्या मालेगाव येथील उपमाहिती कार्यालयात माहिती सहाय्यक म्हणून कार्यरत होते. त्यांची काही दिवसांपूर्वीच मालेगाव येथे बदली झाली होती. एसटी कर्मचार्‍यांचा संप (ST strike) सुरू असल्याने बस बंद आहेत. यामुळे ते त्यांच्या दुचाकीने रोज धुळ्याहून ये-जा करत होते.

गुरुवारी सायंकाळी कार्यालयातून सुटी झाल्यानंतर ते दुचाकीने धुळ्याकडे येत असताना देवारपाडा गावाजवळ त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. यात ते गंभीररीत्या जखमी झाले. परिसरातील ग्रामस्थांनी त्यांना तत्काळ रुग्णवाहिकेने मालेगाव येथील रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार करून त्यांना पुढील उपचारार्थ नाशिक (Nashik) येथे नेले जात असताना रस्त्यातच रात्री एकच्या सुमारास त्यांचे निधन झाले.

शुक्रवारी दुपारी त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात येथे अंत्यसंस्कार झाले. यावेळी नाशिकचे माहिती संचालक ज्ञानेश्‍वर इंगवे, धुळे जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, माहिती सहाय्यक गोपाळ साळुंके यांचेसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here