@maharashtracity

सण-उत्सव, हेळसांड बेफिकरीतून कोरोना लाट ओसरेना

मुंबई: दुसरी लाट (Corona second wave) नियंत्रणात असल्याचे घटत्या रुग्णसंख्येने समोर येत असले तरी लाट ओसरताना दिसत नसल्याचेही समोर येत आहे. ऑक्टोबर महिन्यातील सण उत्सवाच्या काळात दुसऱ्या डोसचा दिवस येऊन देखील लाखो लोकांनी दुसरा डोस टाळला असल्याचे आकडेवारीवरुन समोर येत आहे. राज्य माहितीप्रमाणे (Maharashtra government) (MVA) ऑक्टोबर महिन्यात ७० लाख जण दुसऱ्या डोससाठी पात्र होते. मात्र त्यांनी सणासुदीच्या आणि उत्सवाची कारणे पुढे करत टाळले असल्याचे समोर येत आहे.

दरम्यान तिसरी लाट (corona third wave) आली नसली तरी अद्याप दुसरी लाट सुरु आहे. त्यामुळे संपूर्ण लसीकरण (Vaccination) केल्याशिवाय पर्याय नसल्याचे कोविड टास्क फोर्समधील (covid task force) तज्ज्ञ सांगतात. बेफिकरीतून कोरोना संसर्ग उलट फिरल्यास तिसऱ्या लाटेला सामोरे जावे लागेल असा इशारा देण्यात येत आहे. सध्या राज्यात कोरोना लसीचा बऱ्यापैकी साठा असून शिवाय कोरोना लसीमुळेच दुसरी लाट आटोक्यात येताना दिसत असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. मात्र लसीकरण टाळले जाऊ नये असे आवाहन वारंवार केले जात आहे.

याच काळात गणेशोत्सव पाठोपाठ नवरात्रौत्सव सुरु झाला. या सणा उत्सवाच्या काळात बऱ्याच जणांनी दुसऱ्या डोसचा दिवस आला असताना देखील टाळल्याचे आकडेवारीवरुन समोर येत आहे. राज्यात ७० लाख तर मुंबईत ४.६ लाख जणांनी दुसऱ्या डोससाठी टाळाटाळ केली असल्याचा अंदाज केला जात आहे. तर देशपातळीवर १० कोटींहून अधिक भारतीयांनी त्यांचा दुसरा डोस ( Corona second dose) घेतला नसल्याचे सांगण्यता येत आहे.

Also Read: परदेशात जाणाऱ्या व शासकीय, खासगी कर्मचाऱ्यांना २८ दिवसानंतर दुसरा डोस

सध्याच्या कोरोना विरूद्ध लसीकरण (covisheild) असे चाललेल्या युद्धात लसीकरण करण्याचे आवाहन केले जात आहे. कोरोनापासून पूर्ण सुरक्षितता हवी असल्यास दोन्ही डोस (Covaxin) पूर्ण होणे गरजे असल्याचे ही तज्ज्ञ सांगतात. मात्र सुशिक्षित लाभाथी देखील दुसऱ्या डोससाठी समोर येत नाहीत. ही बेफिकरी कोरोना लाटेला आमंत्रण ठरु शकते असे एका आरोग्य अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

दरम्यान कोविशील्डच्या दुसऱ्या डोससाठी ८४ तर कोवॅक्सिनच्या दुसऱ्या डोससाठी २८ दिवसांचा कालावधी सांगण्यात आला आहे. मात्र अधिक दिवस असलेल्या कोविशील्डचे किंवा कमी दिवस असलेल्या कोवॅक्सिनचे लाभार्थी देखील लसीकरण केंद्रावर दुसऱ्या डोससाठी फिरकले नसल्याचे माहिती देण्यात येत आहे. यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत असून लसीकरण मोहिमा ( Vaccination Camp) आखण्यात येत आहेत. मात्र या मोहिमांना देखील ऑक्टोबर महिन्यात शांत प्रतिसाद मिळाला.

सप्टेंबरमध्ये ( September) दैनंदिन सरासरी ७.६ लाख डोस एवढे होते. तर ऑक्टोबरमध्ये ( October) ५.३ लाखांवर आली होती. म्हणजेच राज्यातील दैनंदिन लसीकरणाची सरासरी ३० टक्क्यांनी घसरली होती. तर राज्यात लसीकरणासाठी राबविण्यात आलेल्या मिशन कवच कुंडल विशेष मोहिमेत (mission kavach kundal campaignmission kavach kundal campaign)१ कोटी लसीकरणाचे उद्दीष्ट ठेवण्यात आले होते. हे उद्दीष्ट्य ५० टक्के पर्यंत गाठता आले. याचवेळी राज्याचे लसीकरण कार्यक्रम प्रमुख डॉ. सचिन देसाई ( Dr. Sachin Desai) यांनी सांगितले की, राज्यातील काही भागात ऑक्टोबर महिन्यात परतणाऱ्या पावसाने अतिवृष्टी केल्याने देखील दुसऱ्या डोससाठी लोक आली नाहीत. यात मराठवाडा जिल्ह्यातील काही भाग येत आहेत. आता पुन्हा लसीकरण कार्यक्रमाकडे लक्ष देऊन दुसऱ्या डोस घेण्यास भाग पाडत असल्याचे सांगण्यात आले.

मुंबई महानगर पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे ( Dr Mangala Gomre) यांनी सांगितले की, लसीकरणाच्या गती मंदावली असून प्रत्येकाने मृत्यू कमी करण्यासाठी दोन्ही डोस घेणे महत्वाचे आहे. पूर्णपणे लसीकरण झालेल्या लोकांमध्ये मृत्यू आणि संसर्ग कमी होत असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here