@maharashtracity

राज्य रक्त संक्रमण परिषदेचे रक्तपेढ्यांना आदेश

मुंबई: कोरोनाची तिसरी लाट (third wave of corona) सुरु झाली आहे. सद्यस्थितीत राज्यातील रक्तपेढ्यामध्ये (blood bank) रक्तसाठा पुरेसा उपलब्ध असला तरीही तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सर्व रक्तपेढ्यांना रक्ताचा पुरेपूर साठा उपलब्ध ठेवण्याचे आदेश राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून देण्यात आले आहेत.

सध्या कोरोना आणि त्याचे व्हेरियंट संसर्ग मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे सरकारकडून निर्बंध कडक करण्यात येऊ शकतात. यातून स्वैच्छिक रक्तदान (blood donation camp) शिबीरे घेण्यास अडचणी निर्माण होण्याचे शक्यता असल्याने राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून आदेश देण्यात आले आहेत.

रक्त साठा उपलब्ध करण्यासाठी कोविड नियमांचे पालन करुन रक्त साठा उपलब्ध करावा असे आदेशात स्पष्ट म्हटले आहे. गर्दी टाळून छोटेखानी स्वैच्छिक रक्तदान शिबीरे आयोजित करणे, हे करत असताना स्थानिक स्तरावर संबंधित महसूल व पोलीस प्राधिकरणास संपर्क साधून रक्तदान शिबिराची गरज पटवून देणे व छोट्या प्रमाणात स्वैच्छिक रक्तदान शिबीरे घेण्यासाठी परवानगी घ्यावी.

तसेच नियमित रक्तदात्यांना संपर्क करुन रक्तकेंद्रातील रक्त संकलन वाढवण्यावर भर देण्यात यावा. तर गृहनिर्माण सोसायटीमध्ये रक्तकेंद्रांतील रक्त संकलन पथक रक्त संकलन वाहनासहित पाठवून रक्त संकलन करण्यावर भर देण्यात यावे. अशा बारिक सारिक निरीक्षणातून रक्त साठा वाढण्यास सुचित करण्यात आले आहेत.

Also Read: ५८ हजार ६७८ मुलांना कोवॅक्सिनचा पहिला डोस

राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषद यांच्या मार्गदर्शक सुचनांनुसार एका रक्तकेंद्रात जादा असलेले रक्त गरज असलेल्या दुसाऱ्या रक्तकेंद्रात पाठवण्यात यावे. या सर्व उपाय योजना करून रक्तकेंद्रामध्ये पुरेसा रक्ताचा साठा उपलब्ध ठेवावा.

तसेच, थॅलेसेमिया रुग्णांना नियमित रक्त संक्रमण करावे लागत असल्यामुळे त्यांच्या बाबतीत रक्ताचा तुटवडा भासणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्यात यावी, असे आदेश आरोग्य सेवा संचालक डाॅ. साधना तायडे यांनी सर्व रक्तपेढ्या प्रमुखांना दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here