@maharashtracity

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा आरोप

मुंबई: महाविकास आघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi) सुपर मार्केट मध्ये वाईन विक्रीसाठी परवानगी देण्याचा घेतलेला निर्णय हा शिवसेना (Shiv Sena) प्रवक्ते संजय राऊत यांची परदेशात वाईन उत्पादकांसोबत झालेल्या बैठकीचा परिणाम आहे, असा अप्रत्यक्ष आरोप भाजप नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केला आहे.

उध्दव ठाकरे सरकारने (Uddhav Thackeray govt) वाईन संदर्भात घेतलेल्या निर्णयाला भाजप (BJP) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोध दर्शविला. महाराष्ट्राचे मद्यराष्ट्र (state of liquor) बनवू देणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी दिला होता. त्यावर शिवसेनेचे राज्यसभा सदस्य असलेले संजय राऊत यांनी टीका केली होती.

या टिकेची दखल घेऊन चे विधान परिषद सदस्य गोपीचंद पडळकर यांनी संजय राऊत यांच्यावर ती जोरदार टीका केली आहे. पडळकर म्हणाले, “जनाब संजय राऊत हे देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपामुळे पुरते बावचळले आहेत. राऊत यांना भीती वाटते की फडणवीस हे राऊत यांची परदेशात वाईन मालकांसोबत (Raut’s meeting with winery producer) झालेल्या बैठकीबाबत खुलासा करतील. त्यामुळेच राऊतांचं ‘झिंग झिंग झिंगाट‘ झालं आहे.”

जे आजपर्यंत कधी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना (farmers) भोगावे लागले नाही ते महाविकास आघाडीच्या काळात शेतकऱ्यांना भोगावे लागले, असा आरोप करून पडळकर म्हणाले, “गावेच्या गावे अंधारात लोटली गेली. ऐन कापणीच्या हंगामात वीज तोडली (power disconnected) गेली. त्यांच्यावर बळाचा वापर करण्यात आला.”

जर खरोखरच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांबद्दल तुम्ही वाईन धोरण राबवत असाल तर हे स्पष्ट करा की तुम्ही महाराष्ट्रात निर्माण झालेल्या वाईनलाच विक्रीची परवानगी द्याल. परदेशात झालेल्या बैठकीतील कंपन्यांना नाही, अशा शब्दात पडळकर यांनी सरकारकडून स्पष्टीकरण मागितले आहे.

पडळकर म्हणाले, “शरदचंद्र पवारांच्या (Sharad Pawar) नावाचा वापर करून आपण वाईन विक्रीचे समर्थन करत आहात. पवारांनी आयुष्यात खुप सोसलं आहे आणि त्याची खंतही जाहीरपणे व्यक्त केलेली आहे. त्यामुळेच मला खात्री आहे की ते महाराष्ट्राच्या तरूण पिढीला नशेत ढकलण्याची भूमिका कधीही घेणार नाहीत.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here