@maharashtracity

धुळे: धुळे (Dhule) शहरातील सुरत बायपास महामार्गावर (Surat bypass highway) मोटरसायकला भरधाव वाहनाने कट मारल्याने झालेल्या अपघातात पोलिस कर्मचार्‍यासह दोघा तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना काल रात्री घडली. येथील दक्षता हौसिग सोसायटीतील हे रहिवाशी असल्याने वसाहतीत शोक व्यक्त केला जात आहे.

काल रविवारी ५ रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास चितोड चौफुली जवळ सुरत बायपास रोडवरुन दक्षता हौसिंग सोसायटीत राहणारे पोलिस कॉन्स्टेंबल निशांत मोहन महाले (वय ३२) हे आपल्या मोटरसायकलने घराकडे जात होते. त्याचवेळी चितोड गावातून पायी घरी जात असलेला मित्र भटू दगाजीराव मोहिते (वय ३८) रा. दक्षता हौसींग सोसायटी हा भेटला.

निशांत महाले याने मित्र भटू मोहितेला आपल्या मोटरसायकलवर बसवले आणि दोघे मित्र पावसात घराच्या दिशेने सुरत बायपस रोडने निघाले होते. तेवढ्यात मागून येणार्‍या अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटरसायकला जोरात कट मारला. त्यामुळे मोटरसायकल घसरुन दोघे जण जोरात खाली पडले. त्यात जबर जखमी होवून मोटरसायकल चालवणारे पो. कॉ. निशांत महाले हे जागीच ठार झाले. तर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या भटू मोहिते याचाही रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

दरम्यान, मयत भटू मोहिते हे सेवानिवृत्त पोलिस जमादार दगाजीराव मोहिते यांचा मोठा मुलगा होता. तो मोल मजुरी करायचा. त्याच्या पश्‍चात २ मुले, आई – वडील, लहान भाऊ असा परिवार आहे. तर निशांत महाले आपल्या वडीलांच्या जागेवर अनुकंपा तत्वावर पोलिस दलात भरती झाला होता आणि सध्या शहादा पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत होता.

त्यांच्या पश्‍चात आई, पत्नी आणि २ मुले असा परिवार आहे. दक्षता सोसायटीतील दोघे तरुण मरण पावल्याने शोक व्यक्त केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here