@maharashtracity

सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई: आरोग्य विभागाची रद्द झालेली परिक्षा विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेवूनच रद्द करण्यात आली. आता साधारणपणे दिनांक १५, १६ ऑक्टोबर किंवा दिनांक २२, २३ ऑक्टोबरला पुन्हा ही परिक्षा होण्याची शक्यता आहे. (Exam of health department may held in next month)

परीक्षांच्या मुद्द्यावर बैठक होणार असल्याने त्या प्रमाणे नियोजन करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

दरम्यान, दिनांक १५, १६ रोजी रेल्वेची परीक्षा असून ती रद्द झाल्यास आरोग्य विभागाला प्राधान्य देता येईल, असेही टोपे यांनी सांगितले. अन्यथा २२, २३ ऑक्टॉबर रोजी परीक्षा घेण्यात येतील असेही टोपे म्हणाले. या मुद्द्यावर बैठक होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ज्या संभाव्य तारखा असतील त्या शाळा सुरु होणार असल्याने नियोजन बघून ठरवल्या जातील. आरोग्य विभागाची बैठक घेऊन पुढील तारखा ठरवू आणि पुढील तारीख लवकरच कळवली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

टोपे म्हणाले, सामान्य प्रशासनाअंतर्गत असलेल्या आयटी विभागाने मागच्या आणि या सरकारच्या अनुषंगाने कंपन्यांची निवड केली होती. ही निवड आरोग्य विभागाने केली नसल्याचे सांगण्यात आले.

आरोग्य विभागाची जबाबदारी एकच होती, ती म्हणजे प्रश्नपत्रिका तयार करणे, त्यामुळे ती कंपनी काळ्या यादीत आहे की नाही, हे पाहणे आयटी विभागाचे काम असते. आरोग्य विभागाचा बाकी काही संबंध नसतो. तरीसुद्धा आरोग्य विभागाने तपासल्यानंतर कंपनीने वेळ मागितल्याने परीक्षा पुढे ढकलण्यात आली, असे टोपे यांनी स्पष्ट केले.

“परीक्षांचे ९५ टक्के काम झाले होते. मात्र काही त्रुटी होत्या. म्हणूनच हॉलतिकीट १० दिवस आधी मुलांच्या हाती मिळतील याची काळजी व्यवस्थित घेतली जाईल. आता कोणतीही ढिलाई दिसणार नाही. चांगल्या स्पिरिटने घ्यावे. १७ हजार जागा भरुन घेणे हाच आमचा हेतू आहे. आरोग्य सेवा सक्षम व्हावी, हा हेतू. आता न्याय देऊन सगळ्या जागा भरुन घेतल्या जातील.”

  • राजेश टोपे, सार्वजनिक आरोग्यमंत्री

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here