@maharashtracity

पवई, भांडुप, कांजुरमार्ग, विक्रोळी कडकडीत बंद

मुंबई: लखीमपूर येथील शेतकरी हत्याकांड व केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला पूर्व उपनगरातील मुलुंड, भांडुप, कांजुरमार्ग, विक्रोळी, पवई ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाला. (Outstanding response to bandh in Eastern suburb)

या ठिकाणी सकाळपासून अत्यावश्यक सेवा वगळता येथील दुकाने दुकानदारांनी उत्स्फुर्त बंद ठेवल्याचे चित्र होते. पवई आयआयटी (Powai IIT) येथे शिवसैनिकांकडून सोबत काँग्रेसच्या (Congress) कार्यकर्त्यांनी फेरी काढून निर्दशन केली. या रॅलीत पंजाबी सांजी सभा संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर जमा झाले होते.

दरम्यान, पूर्व उपनगरात बंदमुळे वातावरण गरम झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. तसेच भांडुप, पवई, विक्रोळी, या परिसरात आमदार सुनील राऊत यांच्या नेतृत्वाखाली शांततमय वातावरणात आपल्या विभागातील व्यवहार बंद करुन शेतकरी हत्याकांडाचा व केंद्र सरकारचा निषेध केला असल्याचे शिवसेना शाखा १२२ चे शाखाप्रमुख सचिन मदने यांनी सांगितले.

तर मुंबई इंटक उपाध्यक्ष सुभाष सिंग यांनी बंद यशस्वी केल्या बद्दल आभार मानले. तर कांजुरमार्ग येथील प्रभाग क्रमांक ११७ मधील दुकानदारांनी या बंदमध्ये सहभाग नोंदवला होता व लखीमपूर घटनेचा निषेध व्यक्त केला.

या दरम्यान कोणताही अनुचुत प्रकार घडला नसल्याचे शिवसेना नगरसेविका सुवर्णा करंजे यांनी सांगितले. पवई येथे राष्ट्रवादी, कॉंग्रेस व शिवसेना महाआघाडी सकाळपासूनच बंदमध्ये सहभागी झाली होती.

सकाळपासूनच येथील परिसरात शुकशुकाट दिसून आला. दुपारी अकराच्या सुमारास पवई मेन गेट येथे निषेध घोषणाबाजी करण्यात आल्या. संध्याकाळी उशीरा या परिसरातील नित्याचे व्यवहार सुरु झाल्याचे दिसून आले. उपनगरात कोणतीही वित्तहानी झाली नसल्याचे पोलीसांकडून सांगण्यात आले.

तसेच पूर्व द्रुतगती मार्गावर विक्रोळ येथे काही आंदोलनकर्त्यांनी लाकूड जाळण्याने वाहतूकीवर थोडा वेळ परिणाम झाला होता. मात्र आगामी अर्ध्यातासात पुन्हा सर्व कायम झाले.

रुग्णालयातील ओपीडी २० टक्क्यांनी घटली

पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांपैकी सायन, केईएम, नायर, कुपर सारख्या प्रमुख रुग्णालयातील महाराष्ट्र बंदचा किंचित प्रभाव झाला असल्याचे समजत आहे. रुग्णालयीन प्रशासनाच्या मते २० टक्के रुग्ण कमी आले.

मात्र हा सर्व परिणाम रोजच्या बाह्यरुग्ण कक्षावर झाला. तरीही रुग्णालयातील अंतर्गत सर्व व्यवहार सुरळीत सुरु होते. प्रवासातील अडथळे नको आणि बंदच्या भितीतून रुग्णांनी येणेच टाळले असल्याचा अंदाज पालिक प्रमुख रुग्णालये संचालक डॉ. रमेश भारमल यांनी व्यक्त केला.

रिक्षा व टॅक्सी चालकांनी वेळ साधली :

मुंबईतील महत्वाच्या प्रवासाच्या साधनापैकी बेस्टने ठराविकच बसेस आगारातून सोडल्या होत्या. यामुळे बसस्टॉप वर तिष्ठत राहण्यापेक्षा रिक्षा किंवा टॅक्सीची प्रवाशांनी मदत घेतली.

मात्र काही ठिकाणी शेअर भाडे नाकारणे, भाडे मीटरप्रमाणे न घेणे अशा सारखे पकार झाल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून करण्यात आल्या. त्यामुळे कार्यालय गाठण्यासाठी मुंबईकरांना सामेवारी कसरत करावी लागली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here