@maharashtracity

मुंबई: राज्यात मंगळवारी ८,४१८ नवीन रुग्णांची नोंद झाली. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी २४ तासात सुमारे १,६७८ संख्येने रूग्ण वाढ झाल्याचे समोर आले.

आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६१,१३,३३५ झाली आहे. काल १०,५४८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ५८,७२,२६८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.०६ % एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण १,१४,२९७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात मंगळवारी १७१ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. नोंद झालेल्या एकूण १७१ मृत्यूंपैकी १२७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ४४ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने राज्यातील एकूण मृत्यूची संख्या २२४ ने वाढली आहे.

हे २२४ मृत्यू, पुणे-६६, रायगड-४४, सांगली-२९, ठाणे-२२, पालघर-१०, सातारा-१०, औरंगाबाद-६, नाशिक-६, हिंगोली-५, कोल्हापूर-५, सोलापूर-५, गडचिरोली-४, चंद्रपूर-३, जालना-२, अहमदनगर-१, जळगाव-१, नागपूर-१, नंदुरबार-१, उस्मानाबाद-१, परभणी-१ आणि सिंधुदुर्ग-१ असे आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०२ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,२९,०८,२८८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६१,१३,३३५ (१४.२५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
सध्या राज्यात ६,३८,८३२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,४४७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईत दिवसभरात ४५५

मुंबईत दिवसभरात ४५५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७२५६१६ एवढी झाली आहे. तर १० कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आता पर्यंत १५५६४ मृत्यूची नोंद करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here