@maharashtracity

तिसऱ्या जिनोम सिक्वेसिंगचा अहवालातून स्पष्ट

मुंबई: कोरोना लसीचे ( Corona Vaccine) दोन्ही डोस घेऊन कोरोनाची बाधा झाली. अशांचे नमुने जिनोम सिक्वेसिंगसाठी ( Genom Sequecing) दिले असता डेल्टा वेरियंटच्या ( Delta varient) प्रभावामुळे संसर्ग झाला असल्याचे जिनोम अहवालातून ( Genom Report) समोर येत आहे. मात्र लस घेतल्यामुळे कोरोना प्रभाव गंभीर नसून तीव्रता कमी करण्यास मदत झाली असल्याचे मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकानी ( Mumbai Municipal Corporation Additional Commissioner Suresh Kakani ) यांनी सांगितले.

दरम्यान तिसऱ्या जिनोम सिक्वेसिंग अहवालावर काकाणी यांनी सांगितले की, एकूण ३४३ नमुन्यांमध्ये डेल्टा व्हेरिअंटचे ५४ टक्के, डेल्टा डेरिव्हेटीव्ह ( Delta derivative) ३४ टक्के तर इतर प्रकारांचे १२ टक्के रुग्ण या निरीक्षणातून समोर आले आहे. कोविड लसीकरणाचा प्रभाव म्हणून साथ पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे या निष्कर्षांवरुन आढळत आहे.

त्यामुळे सर्व पात्र नागरिकांनी कोविड लस घेणे आवश्यक असून कोविड प्रतिबंधक नियमांचे (Covid Prevention Rules) काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे काकाणी म्हणाले. कोविड बाधा झालेल्या एकूण ३४३ रुग्णांच्या वैद्यकीय नमुन्यांची तपासणी करण्यात आली.

Also Read: मलेरिया जैसे थे, डेंग्यूचा ताप वाढला

नमुने घेतलेल्या बाधित ३४३ रुग्णांपैकी ४५ रुग्ण (१२ टक्के) रुग्ण हे ० ते २० वर्षे आतील वयोगटातील आहेत. २१ ते ४० वर्षे वयोगटात १२६ रुग्ण (३७ टक्के), ४१ ते ६०वर्षे वयोगटात ९८ रूग्ण (२९ टक्के) ६१ ते ८० वयोगटात ६३ रुग्ण (१८ टक्के) आणि ८१ ते १०० वयोगटातील १११ रुग्ण (३ टक्के) या चाचणीमध्ये समाविष्ट आहेत. अहवाल निष्कर्षानुसार, ३४३ पैकी १८५ रुग्ण (५४ टक्के) हे डेल्टा व्हेरिअंट तर ११७ रुग्ण (३४ टक्के) हे डेल्टा डेरिव्हेटीव्ह प्रकारातील कोविड विषाणूने बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. उर्वरित नमुन्यांमध्ये इतर प्रकारांचे ४० बाधित रुग्ण (१२ टक्के) असल्याचे निदर्शनास आले आहे.

डेल्टा व्हेरिअंट आणि डेल्टा डेरिव्हेटीव्ह या दोन्ही प्रकारातील कोविड विषाणू तुलनेने सौम्य त्रासदायक असून त्यापासून तितकासा गंभीर धोका संभवत नाही. तर कोविड लस ( Coviesheild) ( Covaxin) घेवूनही कोरोना बाधा झाली झाली या निकषातून पाहिल्यास ५५ नागरिकांना कोविड बाधा झाली तरी फक्त ७ जणांनाच रुग्णालयात दाखल करावे लागले.

५५ पैकी एकाही नागरिकाला प्राणवायू पुरवठा (Oxygen supply ) अतिदक्षता उपचार यांची गरज भासली नाही. तसेच यातील कोणत्याही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

दोन्ही डोस घेतलेल्या १६८ नागरिकांना कोविड बाधा झाली असली तरी त्यापैकी फक्त ४६ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यातही ७ जणांना अतिदक्षता उपचारांची गरज भासली. मात्र कोणाचाही मृत्यू ओढवला नाही, ही बाब नमूद करण्याजोगी आहे.

लसीचा एकही डोस न घेतलेल्या १२१नागरिकांना बाधा झाली. त्यातील ५७ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. एका रुग्णास प्राणवायू पुरवठा, एकास अतिदक्षता उपचार पुरवावे लागले. तर तीन जणांचा मृत्यू ओढवला आहे.

मृत्यू ओढवलेले तिघेही रुग्ण वयोवृद्ध तसेच मधुमेह व अति उच्च रक्तदाबाचा रुग्ण होते. यातील दोघांना डेल्टा डेरिव्हेटीव्ह तर एकास डेल्टा व्हेरिअंटची लागण झालेली होती.

मात्र, या तिन्ही रुग्णांनी कोविड बाधा निदान होवूनही रुग्णालयात दाखल होण्यास विलंब झाल्याने प्राणास मुकावे लागले. म्हणजेच कोविड लस घेणाऱ्यांना व कोविड प्रतिबंधक नियम पाळणाऱ्याना विषाणू बाधेपासून संरक्षण मिळते तसेच बाधा झाली तरी त्याची तीव्रता रोखता येते, असे म्हणण्यास पुरेसा वाव आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here