@maharashracity

राज्यात ४४,३८८ नवीन रुग्णांची नोंद

एकूण ओमिक्रोनबाधित १२१६ रूग्ण

मुंबई: राज्यात रविवारी ४४,३८८ नवीन कोरोनारुग्णांची नोंद झाली. त्याच वेळी दिवसभरात राज्यात २०७ ओमिक्रोनबाधित रूग्ण आढळल्याने राज्यात एकूण १२१६ रूग्ण ओमिक्रोनबाधित रुग्णांची संख्या झाली आहे. यातून राज्यात संसर्ग फैलावबाबत चिंता निर्माण झाली आहे.

दरम्यान, राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची (corona patients) एकूण संख्या ६९,२०,०४४ झाली असून आज १५,३५१ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६५,७२,४३२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.९८% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण २,०२,२५९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

तसेच राज्यात रविवारी १२ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०४% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,०५,४५,१०५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६९,२०,०४४ (९.८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १०,७६,९९६ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत तर २६१४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (Institutional Quarantine) आहेत.

मुंबईत दिवसभरात १९४७४

मुंबईत (Mumbai) दिवसभरात १९४७४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या ९१२५२२ एवढी झाली आहे. तर ७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आतापर्यंत १६४०६ मृत्यूची नोंद करण्यात आली.

रविवारी राज्यात २०७ ओमायक्रॉन रूग्ण

राज्यात रविवारी २०७ ओमिक्रोन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यापैकी १५५ रुग्ण बी जे वैद्यकीय महाविद्यालय यांनी आणि ५२ रुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (NIV) रिपोर्ट केले आहेत. या २०७ बाधितांमध्ये सांगली- ५७, मुंबई -४०, पुणे मनपा – २२, नागपूर- २१, पिंपरी चिंचवड –१५, ठाणे मनपा-१२, कोल्हापूर- ८, अमरावती- ६, उस्मानाबाद-५, बुलढाणा आणि अकोला- प्रत्येकी ४, गोंदिया- ३, तर नंदुरबार, सातारा आणि गडचिरोली- प्रत्येकी २, औरंगाबाद, जालना, लातूर आणि मीरा भाईंदर- प्रत्येकी १ असे आहेत.

आजपर्यंत राज्यात एकूण १२१६ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण (Omicron patients) रिपोर्ट झाले आहेत. यापैकी ४५४ रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी (RT-PCR test) निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here