डच दृष्टीकोन

नेदरलँड्समधील (Netherlands) दृष्टिकोनात कोरोनाव्हायरस (coronavirus) शक्य तितक्या लवकर नियंत्रित करणे (जास्तीत जास्त नियंत्रण) आणि वृद्ध लोक आणि आरोग्याची परिस्थिती ठीक नसलेले लोक असुरक्षित गटांचे संरक्षण करणे हा आहे. सरकारने बंदी घालण्याचे उपाय हे सुरू केलेले आहेत. या उपायांचे लक्ष्य म्हणजे संक्रमणाने होणाऱ्या कोरोनाव्हायरसचे प्रमाण कमी करणे आणि त्या संक्रमणांना अधिक विस्तारित कालावधीत न पसरविणे हा आहे. हा दृष्टीकोन सुनिश्चित करतो की, आरोग्य सेवा ही नक्कीच कोरोना व्हायरसशी सामना करण्यास सक्षम आहे.

सद्य परिस्थिती

34 रुग्ण मृतक, 545 नवीन रुग्ण, एकूण 4749 सकारात्मक चाचणी घेतलेल्या व्यक्ती.

कालपासून, कोरोना व्हायरस (कोविड -१९) (Covid-19) या साथीचे 545 लोकांची चाचणी सकारात्मक (positive) आली आहे. यामुळे नेदरलँडमधील एकूण पुष्टी झालेल्या रुग्णांची संख्या 4749 पर्यंत पोहोचली आहे.

शेवटच्या अद्ययावत माहितीनुसार, कोविड -१९ मुळे 34 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांचे वय 55 ते 97 वर्षे दरम्यान आहे; मृत्यूच्या वेळी सरासरी वय 82 वर्षे आहे.

सद्य उपाय

शाळा आणि बाल देखभाल केंद्रे (childcare) सोमवार 6 एप्रिलपर्यंत बंद आहेत. तसेत हे नियम बार, कॅफे आणि रेस्टॉरंट्स (हॉटेल्स नाही), कॉफी शॉप्स, स्पोर्ट्स क्लब, जिम, पूल आणि स्पोर्ट्स पार्क्सवर लागू आहे.

अशी काही महत्त्वपूर्ण क्षेत्रे आणि प्रक्रिया आहेत जी समाज चालू ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. या महत्त्वपूर्ण क्षेत्रात काम करणारे पालक बाल-देखभालचा वापर करू शकतात. खालील विभाग व प्रक्रिया महत्त्वपूर्ण म्हणून वर्गीकृत केल्या आहेत:

औषधे आणि वैद्यकीय उपकरणांचे उत्पादन आणि वाहतुकीसह आरोग्य सेवा आणि काळजी घेणारे कर्मचारी, शिक्षक आणि सहाय्यक कर्मचारी ज्यांना दूरशिक्षण, शाळांमध्ये मुलांची देखभाल करणे आणि परीक्षांचे पर्यवेक्षण करणे आवश्यक आहे.

सार्वजनिक वाहतूक, अन्न पुरवठा, कोळसा, तेल, पेट्रोल आणि डिझेलसह इंधन वाहतूक,

कचरा संग्रह करणारे कर्मचारी, चाईल्ड केअर, आपत्कालीन सेवा (पोलिस सेवा आणि संरक्षण संस्था यापूर्वीच गंभीर म्हणून वर्गीकृत केल्या गेल्या आहेत).

नियंत्रण कक्ष प्रक्रिया, अग्निशमन सेवा, रुग्णवाहिका सेवा, प्रादेशिक आणीबाणी वैद्यकीय सेवा (जीएचओआर), सुरक्षा क्षेत्रे ’संकट व्यवस्थापन, आवश्यक सरकारी प्रक्रिया (केंद्र, प्रांतिक आणि महानगरपालिका सरकार) जसे की फायदे आणि भत्ते, लोकसंख्येचे व्यवहार, दूतावास , संरक्षक संस्था आणि न्यायवैद्यकीय दवाखाने देणे या वर्गीकृत केल्या आहेत.

एनएलअलर्ट (NL-Alert) कोरोनाव्हायरस प्रतिबंध नियम
 कोरोनाव्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी मुख्य नियम लोकांना आठवण करून देण्यासाठी रविवार 22 मार्च रोजी सकाळी एनएल-अलर्ट (लोकांच्या मोबाइल फोनवर) पाठविला गेला.  द हेग मधील नॅशनल क्राइसिस सेंटरने (National Crisis Centre in The Hague) हा-अलर्ट   संपूर्ण नेदरलँड्समध्ये पाठविला होता.
एनएल-अलर्टने पुन्हा एकदा कोरोनाव्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी त्यांनी कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत याची आठवण करून दिली.  

इशारा खालीलप्रमाणे होता
‘केंद्र सरकारच्या सूचनांचे अनुसरण करा, 1.5 मीटर’ अंतर ठेवा, 

आपण आजारी असल्यास किंवा सर्दी असल्यास घरीच रहा.  स्वत: चे आणि आपल्या आसपासच्यांचे रक्षण करा. 
जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, एनएल-सतर्कता बर्‍याच डिजिटल होर्डिंगवर आणि सार्वजनिक वाहतुकीसाठी निघण्याच्या वेळेच्या प्रदर्शनात देखील दर्शविली जाते आहे. आपल्या सभोवतालच्या लोकांना मदत करा आणि त्यांना कळवा जेणेकरून त्यांना काय चालले आहे आणि काय करण्याची गरज आहे याची माहिती होईल. 

तसेच, प्रवास सल्लागाराच्या मत्ते,अत्यांवश्यक असल्यासच परदेशात प्रवास करा.कोरोनाव्हायरसचा पुढील प्रसार रोखण्यासाठी असंख्य देश कठोर उपाययोजना करीत आहेत. आणखीन नवीन उपाय लागू केले जाऊ शकतात आणि परिस्थिती वेगाने बदलूही  शकते.त्यामुळे शक्य असल्यास प्रवास टाळा.
सामाजिक बांधिलकी जपत सुजाण नागरीक बनुया आणि कोरोनाच्या या संक्रमणां विरूध्द  सर्वांनी एकत्र लढुया.

(लेखिका अ‍ॅड प्रणिता अद्वैत देशपांडे, हेग नेदरलँड्स येथील रहिवासी आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here