X: @maharashtracity

ठाणे: दि ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशन (The Blind Welfare Organisation) आणि रोटरी क्लब ऑफ ठाणा सेंट्रल (Rotary Club of Thane Central) यांच्या संयुक्त विद्यमाने व विहंग चॅरिटेबल ट्रस्ट (Vihang Charitable Trust) यांच्या सहकार्याने 25 व 26 डिसेंबर रोजी सिंघानिया हायस्कूल, ठाणे येथे अंधांच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धांना (Statewide tournament for Blinds) सुरुवात होणार आहे. या स्पर्धेमध्ये मुंबई, पुणे, सोलापूर, मराठवाडा, अकोला, चंद्रपूर, नाशिक व शेष महाराष्ट्र या आठ संघांचा समावेश होणार आहे.

ही स्पर्धा बाद फेरीने होणार असून अंतिम सामना 25 डिसेंबरला दुपारी दोन वाजता सिंघानिया हायस्कूल येथे होईल. विजेत्या व उपविजेत्या संघांना रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती रोटरी क्लबच्या अध्यक्ष माधवी डोळे व स्पर्धेच्या मार्गदर्शिका नेहा निंबाळकर यांनी दिली.

या स्पर्धेचे उद्घाटन 25 डिसेंबर रोजी ठाण्याचे आमदार प्रताप सरनाईक (MLA Pratap Sarnaik) यांच्या हस्ते होणार असून भारताचे प्रतिनिधित्व केलेले दोन खेळाडू तसेच, राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करणारे खेळाडूही सहभागी होणार असल्याची माहिती द ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष अरुण भारस्कर यांनी दिली.

या स्पर्धेत चमकदार खेळी करणाऱ्या 14 खेळाडूंची महाराष्ट्राच्या संघाकरता निवड होणार होईल. या राष्ट्रीय स्पर्धा 10 ते 12 जानेवारी 2024 रोजी ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई येथे संपन्न होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here