X: @maharashtracity

अक्कलकोट: श्री स्वामी समर्थांच्या सेवा कार्यातून अक्कलकोटचा विकास हे माझे ध्येय आहे, असे प्रतिपादन अक्कलकोट संस्थान नरेश श्रीमंत मालोजीराजे भोसले यांनी श्री स्वामी समर्थ अनुभूती प्रकल्प सादरीकरणप्रसंगी व्यक्त केले.  

राजघराण्याच्या राम तलाव या निसर्गरम्य परिसरात ४२ एकरात हा प्रकल्प साकारला जाणार असून या ठिकाणी १०८ फूट उंचीची श्री स्वामी समर्थांची मूर्ती स्थापना केली जाणार आहे. नवीन राजवाडा प्रांगणात शानदार समारंभात राजेशाही थाटात हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून श्रीमंत छत्रपती वृषाली राजे शिवाजी राजे भोसले (सातारा), श्रीमंत गोपाळ राजे पटवर्धन (मिरज), श्रीमंत नंदिता राजे घाटगे (कागल), श्रीमंत पद्मजाराजे पटवर्धन (मिरज) हे उपस्थीत होते.  

कार्यक्रमाचा शुभारंभ श्री स्वामी समर्थांचे प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आला. यावेळी सिने अभिनेते अशोक कुलकर्णी यांनी श्री स्वामी समर्थांची भूमिका साकारली आणि मनोगत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर श्रीमंत मालोजीराजे भोसले, श्रीमंत छत्रपती वृषाली शिवाजी राजे भोसले, श्रीमंत गोपाळ राजे पटवर्धन (मिरज), श्रीमंत पद्मजाराजे पटवर्धन (मिरज), श्रीमंत नंदिता राजे घाटगे (कागल) उपस्थित होते. 

श्रीमंत मालोजीराजे भोसले म्हणाले, विख्यात शिल्पकार भगवान रामपुरे यांना श्री स्वामी समर्थांचा दृष्टांत झाला आणि तो दृष्टांत स्वामी नगरी अक्कलकोटमध्ये भव्य प्रमाणात साकारला जाणार आहे. यासाठी सर्व स्वामी भक्तांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. तसेच अनुभूती प्रकल्पाचे वास्तुविशारद डॉ महेश नामपुरकर यांनी या प्रकल्पाचा मास्टर प्लॉन कसा घडवुन आणला व तो किती तासामध्ये घडवुन आणला याचे सविस्तर वर्णन केले. 

डॉ महेश नामपुरकर यांनी या जागेचा नकाशा पाहताचा स्वामी महाराज निद्रा स्थितीमध्ये दिसुन आले. या प्रकल्पासाठी अक्कलकोट राजघराण्याची शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेली जागा श्रीमंत मालोजीराजे भोसले यांनी निवडली आहे. या जागेची निवड श्री स्वामी महाराजांच्या दुष्टांतामुळे निवडली आहे.

श्रीमंत मालोजीराजे भोसले यांनी त्यांच्या कमी वयामध्ये एवढा मोठा प्रकल्प साकारला आहे. या प्रकल्पामधुन अक्कलकोट येथील नगरवासीयांना मोफत वैघकीय उपचाराची सेवा उपलब्ध करण्यात येणार आहे. हा प्रकल्प म्हणजे अक्कलकोट गावाच्या प्रगतीची सुरूवात आहे. यावेळी अनुभूती या पुस्तकाचे प्रकाशन आणि अक्कलकोट राजघराण्याचा इतिहास या संकेतस्थळाचे उद्घाटन देखील करण्यात आले.

Click: https://www.royalfamilyakkalkot.com/en/akkalkot-anubhuti.html 

या कार्यक्रमाला ॲड जयाजीराजे भोसले, जयप्रभादेवी राजे भोसले, ॲड सयाजीराजे भोसले, सत्यशिल ढमाले, मधुवंती ढमाले,  जयहिंद शुगरचे चेअरमन गणेश माने- देशमुख, दिपक पाटील (सातारा), सभापती संभाजी इंदलकर (सातारा), उद्योगपती श्रीधर कंगराळकर, आशिष कदम, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मल्लिनाथ साखरे,  मल्लम्मा पसारे, सोनल जाजू उन्नती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील, इतिहासकार डॉ. सतिश कदम, मुकुंद घाटगे, आकाशवाणी निवेदक मारूती बावडे, जयसिंह पाटील, जितेंद्र जाजू, लक्ष्मण रामपूरे, डॉ विपुल शहा, स्वामीराज रामदे, रोहन जिरोळे, अनिल जाविया आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनश्री दामले (मुंबई) यांनी केले.

Also Read: माफी मागितली नाही तर शासन आपल्या दारी कार्यक्रम उधळणार  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here