मुंबई
हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी लोक अनेक उपाय करतात. उबदार कपडे घालणे, हीटर वापरणे आणि मोजे घालणे यांसारख्या (Winter Tips) अनेक गोष्टींचा आपल्या जीवनशैलीत समावेश होतो. परंतू रात्री मोजे घालून झोपणे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
रात्री झोपताना मोजे घातल्याने शरीरातील रक्ताभिसरणावर परिणाम होतो. यामुळे अस्वस्थता आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. याशिवाय इतरही अनेक समस्या उद्भवू शकतात. हिवाळ्यात रात्री झोपताना मोजे का घालू नयेत, का ते हे जाणून घेऊया.
- – रात्री झोपताना मोजे घातल्याने पायांना रक्तप्रवाह कमी प्रमाणात होऊ शकतो. यामुळे पायांना सूज येऊ शकते आणि व्यक्तीला थकवा जाणवू शकतो.
- – रात्री मोजे घातल्याने पायाचं तापमान वाढू शकतं. यामुळे अतिउष्णतेची समस्या उद्भवू शकते, ज्यामुळे अस्वस्थता वाढू शकते.
- – थंडीत अनेकदा लोक दिवसभर मोजे घालून फिरतात. आणि तेच मोजे घालून झोपतात. यामुळे मोज्यांना चिकटलेली धूळ-माती यामुळे त्वचेला एलर्जी होऊ शकते.
- – रात्री मोजे घातल्याने पायांच्या नसांवर दाब येऊ शकतो. यामुळे हृदयाला त्रास जाणवू शकतो, किंवा श्वास घेण्यास अडथळा येऊ शकतो.
- – रात्री मोजे घातल्याने झोपायला त्रास होऊ शकतो. यामुळे झोपेची गुणवत्ता कमी होऊ शकते.
- रात्री मोजे घालण्याऐवजी…
खोलीचं तापमान आरामदायी ठेवा, आल्हाददायक चादर घ्या आणि झोपण्यापूर्वी गरम दूध प्या.
(वरील लेख सामान्य माहितीच्या आधारावर असून कोणत्याही गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या)