मुंबई

31 डिसेंबरच्या रात्री प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार नववर्षाचं (New Year 2024) स्वागत करतो. बरेच लोक कुटुंब आणि मित्रांसह घरी पार्टी आयोजित करतात. त्याच वेळी, काही लोकांना हॉटेल, क्लब किंवा बाहेर जाऊन पार्टीत मज्जा मस्ती करायला आवडतं. घरातील असो की बाहेर, लोकांना या प्रसंगाचा पुरेपूर आनंद घ्यायचा असतो. ते त्यांच्या आवडत्या पदार्थांचा आस्वाद घेतात, नाचतात, खेळ खेळतात, दारू पितात आणि खूप मजा करतात.

अशा परिस्थितीत जे लोक नवीन वर्षाच्या पार्ट्यांमध्ये अनेकदा ड्रिंक्स घेतात, त्यांना दुसऱ्या दिवशी हँगओव्हरची भीती असते. अशा वेळी आज तुम्हाला हँगओव्हर टाळता येईल अशा काही ड्रिंक्सबद्दल सांगणार आहोत.

शॉट इन द डार्क
थंडीच्या दिवसात गरम चहा आणि कॉफीची वेगळीच मजा असते. तुम्हाला माहितीये, चहा एक शॉट दारू सह प्यायली जाते. या कॉम्बिनेशला शॉट इन द डार्क म्हटलं जातं आणि हे पेय प्रसिद्धही आहे. हे ड्रिक्स शरीरातील उष्णता वाढवतं आणि थोडा नशाही देते. या ड्रिक्समुळे तुम्ही मजा करू शकाल आणि हँगओव्हरही कमी होईल.

आइस टी
आइस टीमध्ये व्होडका, रम, जिन आदीसह थोडासा कोला आणि लिंबाचा रस एकत्र केला जातो. हे एक स्वादिष्ट पेय असून यात अल्कोहोलचं प्रमाण कमी असतं. यासाठी पार्टीनंतर हँगओव्हर होत नाही.

ज्यूससह रम
संत्र, नारळ पाणी, अननस यांसारख्या फळांच्या रसात थोडसं रम घालून पिऊ शकता. यामुळे एक मॉकटेल तयार होतं. यात अल्कोहोलचं प्रमाण कमी असल्याने हँगओव्हरची चिंता राहत नाही.

जिंजर बियर डॅश
जिंजर बियर आणि बकार्डी रसचं कॉम्बिनेशनमुळे समतोल राहतो. जिंजर बियर कडू असतं आणि बकार्डी रम थोडी गोडसर.. या ड्रिंकमध्ये अल्कोहोलचं प्रमाण कमी असतं. तुम्ही बर्फ घालून हे पेय घेऊ शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here