रत्नागिरी

विषप्रयोग झाल्याने रुग्णालयात असल्याच्या चर्चेत आलेला अंडरवर्ल्ड डॉन कुख्यात दाऊद इब्राहिम कासकर याच्या रत्नागिरीतील संपत्तीबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 1993 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम हा कोकणातील असून रत्नागिरीतील मुंबके येथे दाऊदच्या मालकीच्या चार जागा आहे. पुढील महिन्यात 5 जानेवारी 2024 रोजी या जमिनींचा लिलाव होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दाऊदने बेकायदेशीर मार्गाने अमाप संपत्ती जमवली आहे. रत्नागिरीतील खेडमधील मुंबके गावात दाऊदच्या चार जागा आहेत. मुंबईला रवाना होण्यापूर्वी साधारण 1970 पर्यंत याच गावात दाऊदने आपलं बालपण घालवलं आहे. या 20 गुठ्यांहून अधिक जमिनीचा लिलाव करण्यात येणार आहे. सरकारने याची किंमत 19 लाखांपर्यंत ठेवली आहे. ही शेतजमीन असून सध्या पडीक आहे.

नोव्हेंबर 2020 मध्ये, मुंबके गावातील इतर पाच मालमत्तांसह दाऊदच्या बालपणीच्या घराचा लिलाव करण्यात आला, परंतु लोटे गावातील आणखी एक भूखंड काही तांत्रिक समस्यांमुळे विकला गेला नाही. त्यापूर्वी, नोव्हेंबर 2017 मध्ये, दक्षिण मुंबईतील इतर तीन प्रमुख मालमत्ता, ज्यात खोल्या, एक गेस्ट हाऊस आणि एक हॉटेल विकले गेले होते.

सध्या दाऊद कराचीमध्ये लपल्याचं सांगितलं जात आहे. दाऊदवर १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाचा आणि अनेक दहशतहल्ल्यासाठी जबाबदार आहे. या आठवड्याच्या सुरुवातील त्याच्यावर पाकमध्ये विषप्रयोग करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचंही सांगितलं जात होतं. मात्र डी कंपनीने हे वृत्त चुकीचं असल्याचं सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here