@maharashtracity

मुंबई: ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (Drugs Controller General of India – DCGI) मोलनुपीरवीरच्या उपचाराला हिरवा कंदील दाखवला आहे. मात्र त्याच वेळी ही फक्त आपत्कालीन परवानगी असल्याचेही स्पष्ट केले आहे.

या आपत्कालीन परवानगीला राज्य कोविड-१९ (covid-19) टास्क फोर्स सदस्यांनी देखील दुजोरा देत ज्येष्ठांसह सहव्याधीतील, जोखमीच्या रुग्णांवर मोलनुपीरवीर औषध (Molnupiravir dose) प्रभावी असल्याचे म्हटले आहे. शिवाय मोलनुपीरवीरच्या उपचाराबाबत काही अटी देखील घालण्यात आल्या आहेत.

दरम्यान, महाराष्ट्र राज्य सरकारने सोमवारी रात्री उशिरा सार्स कोविड संसर्गाच्या उपचारांमध्ये मोलनुपीरवीरच्या वापराबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. काही विशिष्ट परिस्थितीत पूर्ण सल्ल्यानेच औषध वापर व्हावा असे राज्य कोविड टास्क फोर्सकडून (covid task force) अट घालण्यात आली आहे.

दिनांक १७ जानेवारी सोमवारी रात्री राज्याचे मुख्य अतिरिक्त सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी मोलनुपीरवीर वापराबाबतचं पत्र जारी केले. या पत्रात मोलनुपीरावीर हे एक अँटीव्हायरल औषध आहे. ऑक्सिजनची (oxygen) आवश्यकता नसलेल्या सौम्य आजार असलेल्या रूग्णांना कोविडच्या उपचारांसाठी हे औषध लिहून दिले जाऊ शकते.

एक किंवा अधिक जोखीमीच्या आजारांवर रुग्णालयात दाखल असणाऱ्या रुग्णांना कोणताच पर्याय उपलब्ध नसल्यास तसेच मोलनुपिरावीरच्या वापरासाठी कोणतेही विरोधाभास नसलेल्या रुग्णांमध्ये ते वापरता येते असे म्हटले आहे. दरम्यान, याच पत्रात औषधाची विरोधी बाजू देखील स्पष्ट केली आहे.

ओडिशासारख्या (Odisha) काही राज्य सरकारांनी हे औषध उपचारांतून काढून टाकले आहे. तर आयसीएमआरनेदेखील (ICMR) कोविड संसर्गाच्या उपचारात त्याचा वापर करण्याची शिफारस केलेली नाही. भारत सरकारने 17 जानेवारी 2022 रोजी जारी केलेल्या मानक उपचार प्रोटोकॉलमध्ये मोलनुपिरावीरचा समावेश करण्यात आलेला नाही.

मोलनुपीरावीरने क्लिनिकल चाचणीत हॉस्पिटलायझेशन कमी केल्याचे निदर्शनास आले आहे आणि त्यामुळे एफडीएची (FDA) मान्यता नसून फक्त आपत्कालीन वापरासाठीच मान्यता देण्यात आली असल्याचे स्पष्ट सांगितले आहे.

यावर बोलताना राज्य कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित (Dr Rahul Pandit) यांनी सांगितले की, ज्येष्ठ रुग्ण, एकाहून अधिक सहव्याधीतील जर्जर रूग्ण, तसेंच दोन ते तीन दिवस लक्षणांवर उपचार करून देखील बरे न होणाऱ्या रुग्णांना हे औषध पहिल्या तीन ते पाच दिवसांच्या आत देऊ शकते.

मात्र, गर्भवती महिला, १८ वर्षांखालील रुग्ण, स्तनदा माता तसेच आगामी तीन ते सहा महिन्यांत बाळासाठी इच्छुक असलेल्या गटातील कोविड रुग्णांमध्ये या ड्रगचा वापर करता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here