@maharashtracity

गत दाेन वर्षाच्या तुलनेत यंदा मलेरियाच्या रुग्णांची संख्या घटली
पालिका आरोग्य विभागाची माहिती अहवाल

मुंबई: गत दाेन वर्षाच्या तुलनेत यावर्षी मलेरियाच्या रुग्णांत (Malaria patient) घट झाली असल्याचे समाेर आले आहे. दीड वर्षांपासून काेराेना काळ सुरु असताना, साथीच्या आजाराच्या रुग्णांमध्येही चढ-उतार दिसून येत आहे. पण गेल्या दाेेन वर्षांच्या तुलनेत यंदा मलेरिया रुग्णसंख्या घटली असल्याचे पालिका आरोग्य विभागाच्या अहवालावरून दिसून येत आहे.

सन २०१९ मध्ये मलेरियाचे ४३५७ रुग्ण, सन २०२० मध्ये ५००७ रुग्ण आढळले हाेते, तर यंदाच्या वर्षात सष्टेंबरपर्यंत ३६०६ रुग्ण आढळून आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. तर यंदाच्या वर्षात साथीच्या आजारामुळे हाेणाऱ्या मृत्युचे प्रमाणही कमी झाले असल्याचे उघड झाले आहे.

दरम्यान, सन २०१९ मध्ये साथीच्या आजारामुळे २० जणांचा मृत्यु झाला हाेता. तर २०२० मध्ये १२ जणांचा तर २०२१ मध्ये आतापर्यंत लेप्टाेमुळे (Leptospirosis) एकाचा मृत्यु झाला असल्याचे आराेग्य विभागाचे म्हणणे आहे. पालिका आरोग्य विभागाने जारी केलेल्या अहवालानुसार, यंदाच्या वर्षात साथीच्या आजाराच्या रुग्णांमध्ये घट झाली आहे.

डेंग्यू (Dengue), मलेरिया, लेप्टाे, गॅस्ट्राे हेपटीटीस (Gastro Hepatitis), एच१एन१ या आजाराच्या रुग्णांची संख्या मागील दाेन वर्षांच्या तुलनेत कमी झाली आहे. अनेक वर्षांपासून पालिका आराेग्य विभाग राबवित असलेल्या विविध जनजागृतीमुळे साथीच्या आजारांची संख्या घटली असल्याचे पालिका वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

दुसरीकडे, गेल्या दीड वर्षांपासून काेराेनाचे रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. काेराेनाच्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी पालिका आरोग्य विभाग प्रयत्न करत आहे. यातच काेराेना व साथीच्या आजाराची लक्षणे समान असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण हाेत आहे.

याबाबतही आराेग्य विभागाने जनजागृती माेहिम सुरु केली आहे. घराेघरी जावून ताप तसेच इतर लक्षणे असल्यास त्वरीत पालिका दवाखान्यात अथवा रुग्णालयात उपचार घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय काेराेनावर नियंत्रण मिळविण्यासाठी लसीकरण माेहिमेवर अधिकाधिक भर दिला जात असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

साथीच्या आजारासाठी स्वंतत्र कक्ष उभारण्यात आले आहेत. तसेच आराेग्य सेविका घराेघरी जावून मलेरिया डेंग्यू व इतर साथीच्या आजारांबाबत नागरिकांची इत्यंभूत माहिती घेवून जनजागृती केली जात आहे.

सन २०१९ या वर्षी ४३५७ मलेरिया रूग्ण आढळले. तर २०२० सालात मलेरियाचे ५००७ रूग्ण आढळले. मात्र यावर्षी १२ सप्टेंबर पर्यंत ३६०६ रूग्ण आढळले. तर २०१९ वर्षात २८१ लेप्टाे रूग्ण, २०२० वर्षत २४० रूग्ण आढळले तसेच १२ सप्टेंबर २०२१ या वर्षात १५१ रूग्ण आढळले.

तसेच २०१९ या वर्षात ९२० डेंग्यूचे रूग्ण आढळले. तर २०२० या वर्षात १२९ डेंग्यूचे रुग्न आढळले. तर १२ सप्टेंबर पर्यंत ३०५ डेंग्यू रूग्ण आढळले. तर गॅस्ट्राेचे २०१९ या वर्षात ७७८५ रूग्ण, २०२० वर्षात २५४९ रूग्ण तर १२ सप्टेंबर २०२१ पर्यंत गॅस्ट्रोचे १९६४ रूग्ण आढळले. कावीळ आणि एच१एन१ आजाराचे यावर्षी अनुक्रमे १७९ व ५२ असे रूग्ण आढळले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here