@maharashtracity

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत काम करणाऱ्याकंत्राटी कामगारांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुंबई: सेवा काळ २० ते २२ वर्षाचा, क्षयरोग निर्मुलन (Eradication of TB) सारख्या महत्वाच्या कार्यक्रमांतर्गत काम करणारे हे कर्मचारी, मात्र कंत्राटी कामगारांप्रमाणेच (contract workers) वागणूक यातून वैतागलेल्या कर्मचाऱ्यांनी किमान सरकारी सेवेत सामाविष्ट करुन घ्या, अशा मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना दिले आहे. दरम्यान, म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना या कामगारांच्या पाठीशी असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले आहे.(Contract workers demand to accommodate in permanent service)

क्षयरोग निर्मुलनासाठी राज्यात राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम १९९७ पासून राबवला जात आहे. हा कार्यक्रम महत्वाचा असल्याने या कार्यक्रमातंर्गत कामगार भरती करण्यात आली. मात्र, मुंबई महानगरपालिका (BMC) ही भरती कंत्राटी पद्धतीने करते.

गेल्या २० ते २२ वर्षापासून काम करणाऱ्या कामगारांना अद्याप सेवेत घेतले नसून ते कंत्राटी तत्वावरच काम करत आहेत. हे काम करतांना या कर्मचाऱ्यांना क्षयाची बाधा होण्याची अधिक शक्यता असते. तरीही क्षयरोग कंत्राटी कर्मचारी हे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता क्षयरोग रुग्णांच्या घरी जाऊन त्यांना धीर देऊन उपचार सुविधा देत आहेत.

Also Read: आशा स्वयंसेविकाना दिवाळीपूर्वी थकबाकी देण्याचे आश्वासन

मात्र या कर्मचाऱ्यांना अतिशय तुटपुंजे वेतन दिले जात आहे. गेल्या २० वर्षात यांच्या कामात मात्र १० ते १५ पटीने वाढ झाली असून वेतनामध्ये काहीच वाढ झाली नसल्याचे कामगार सांगतात. तसेच वार्षिंक रजा या अतिशय कमी असून त्यात अजूनपर्यंत वाढ करण्यात आलेली नाही.

अतिजोखम व घातकी संसर्गजन्य आजारात काम करत असूनही या कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे विमा संरक्षण दिले जात नाही. जीवावर बेतणारे हे काम असून देखील इतर सेवा सुविधा ही दिल्या जात नसल्याचेहा कामगार सांगतात.

त्यामुळे या कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेत सामावून घेण्यात यावे, अशी मागणी होत आहे. ही मागणी गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित असून या मागणीचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम व सरचिटणीस सत्यवान जावकर यांनी दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here