@maharashtracity

धुळे स्थानकात सर्वपक्षीय नेत्यांसह प्रवाशांकडून स्वागत

धुळे: कोरोना महामारीमुळे (corona pandemic) तब्बल पावणे दोन वर्षापासून बंद असलेली धुळे-चाळीसगाव पॅसेंजर रेल्वेसेवेला अखेर सोमवारपासून प्रारंभ झाला. चाळीसगावहून मेमू सेवेला सुरुवात झाली.

दिल्ली येथून रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve), खा.डॉ.सुभाष भामरे (MP Dr Subhash Bhamare), खा.उन्मेश पाटील (MP Unmesh Patil) यांनी मेमूला हिरवी झेंडी दाखवत सेवेचा शुभारंभ केला. ती सकाळी साडेदहा वाजता धुळ्यात (Dhule) दाखल झाली.

यावेळी महापौर प्रदीप कर्पे, नगरसेवक हिरामण गवळी, किशोर थोरात, गणेश दशपुते, राष्ट्रवादीचे कैलास चौधरी, तालुकाध्यक्ष राजेंद्र चित्तोडकर, मनिष चौधरी, डॉ.योगेश सुर्यवंशी यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी मेमूचे स्वागत केले. यावेळी सिनीअर डीईडीआरएस हर्षल अलंकार, सौरभ गोयल व स्टेशन मॅनेजर संतोष जाधव व रेल्वे चालकाचा स्थानकावर सत्कार करण्यात आला.

मेमू रेल्वेचे धुळे स्थानकावर दाखल होताच प्रवाशांनी एकच जल्लोष केला. महापौरांसह सर्व पक्षीयांनी पुष्पहार घालून मेमुचे पुजन केले. सकाळी 10.50 वाजता ही मेमु 56 प्रवाशांना घेवून पुन्हा चाळीसगावकडे (Chalisgaon) रवाना झाली. दरम्यान ही रेल्वे सुरू होण्यासाठी खा.डॉ.सुभाष भामरे व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र चित्तोडकर यांच्यासह पदाधिकार्‍यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले आहे. त्यामुळे प्रवाशांनी आनंद व्यक्त केला.

धुळे-चाळीसगाव मेमू ट्रेनचे प्रवास भाडे 35 रूपये असून मेमूमुळे चाळीसगावहून मुंबईला जाणार्‍या प्रवाशांची सोय झाली आहे. या मेमू ट्रेनच्या (Memu train) दिवसातून केवळ दोन फेर्‍या होतील. सोमवारी पहिल्या दिवशी मेमूच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. सायंकाळच्या वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तसेच इतर दिवशीही निर्धारित वेळेतच मेमू धावणार आहे.

ही रेल्वे चाळीसगावहून सकाळी साडेसहा वाजता सुटेल आणि धुळ्याला 7.35 वाजता येईल. धुळ्याहून 7.50 ला निघेल व चाळीसगावला 8.55 ला पोहोचले. तसेच सायंकाळी 5 वाजता निघेल आणि धुळ्याला 18.35 ला येईल आणि धुळ्याहून 19.20 ला निघेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here