@maharashtracity

मुंबई: राज्यात गुरुवारी १४१८ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची (corona patient) एकूण संख्या ६६,०७,९५४ झाली आहे. गुरुवारी २,११२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६४,४५,४५४ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.५४% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण १८,७४८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

तसेच राज्यात गुरुवारी ३६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.

Also Read: एस टी कर्मचाऱ्यांचा संप मागे

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,२३,१६,९१० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,०७,९५४ (१०.६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १,७१,२०० व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ८९६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईत दिवसभरात ३२४:

मुंबईत दिवसभरात ३२४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७५५८०४ एवढी झाली आहे. तर ६ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आतापर्यंत १६२३५ मृत्यूची नोंद करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here