@maharashtracity

मुंबई: तब्बल ९० कोटी रुपयांचे देयके राज्य शासनाकडून अदा न झाल्याने औषध पुरवठादारांनी सरकारी रुग्णालयात औषध पुरवठा थांबवला आहे. ही देयके न मिळाल्यास आत्महत्या करू, असा इशारा औषध पुरवठादारांनी दिला आहे.

निवेदन देऊन आणि पाठपुरावा करून देखील वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाचे (DMER) संचालक आणि शासन त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे पुरवठादार सांगतात. हाफकिनसह (Haffkine Institute) ज्यांनी डीएमईआरकडे औषध पुरवठा केला आहे, त्यांचे किमान 90 कोटी रुपये बाकी आहेत. तर ज्यांनी थेट डीएमईआर अंतर्गत पुरवठा केला होता, त्यांचे किमान 40 कोटी देणे बाकी आहेत.

दरम्यान, आमदार राहुल नार्वेकर (MLA Rahul Narvekar) यांनी सरकारी रुग्णालयात औषध तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांचा जीव धोक्यात आला असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना कळवले आहे.

दरम्यान काही वर्षांपासून औषध पुरवठादारांचे थकीत देये सरकारकडून दिले गेले नसल्याने औषध पुरवठादारांनीही रुग्णालयांना औषध पुरवठा करण्याचे थांबवले आहे.

औषध पुरवठा थांबवल्याने रुग्णालयात औषधं उपलब्ध नाहीत. त्यामुळे, रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा भासत असल्याचे ऑल फूड अ‍ॅण्ड ड्रग लायसन्स होल्डर्स फाऊंडेशनचे (All Food And Drug License Holders Foundation – AFDLHF) अध्यक्ष अभय पांडे यांनी सांगितले.

ते म्हणाले, आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून औषधांचा पुरवठा रुग्णालयांना करत आहोत. अद्यात देयके पूर्ण झालेली नाहीत. औषधांची थकीत देयके अद्याप पूर्ण झाली नसल्याने आम्ही आत्महत्येचा इशारा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here