@maharashtracity

स्वच्छता नसल्याने परिसरात दुर्गंधी

महाड (रायगड): महाड नगरपालिकेने (Mahad Municipal Council) महाड व परिसरातील नागरिकांच्या सेवेसाठी उभारलेले ई टॉयलेट्सला (e- toilets) नागरिकांनी सुरवातीपासूनच नापसंती दर्शवली होती. त्यातच वापराचे ज्ञान नसल्याने आतच अडकण्याच्या घटना देखील घडल्या होत्या. यामुळे बंद राहिलेले हे ई – टॉयलेट योग्य वापरात येत नसल्याने याठिकाणी दुर्गंधी पसरवण्यास कारणीभूत ठरत आहे.

महाड नगरपालिकेने स्वच्छता अभियानामध्ये (Swachta Abhiyan) उत्तम कामगिरी केल्यानंतर देशामध्ये चांगले नाव कमावले व पुरस्कारही मिळवले. अशाच स्वच्छता अभियानामध्ये एक पाऊल पुढे टाकण्यासाठी पालिकेने महाड शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या लायन्स क्लब (Lions Club) येथे दोन ई – टॉयलेटची उभीरणी केली आहे.

मोठ्या शहरात असणारी हि टाँयलेटस महाडमध्ये पालिकेने उभी करुन आधुनिकतेकडे पाऊल टाकले खरे पण सुरवातीपासूनच या ई – टॉयलेटकडे नागरिकांनी सपशेल पाठ फिरवली. या ई – टॉयलेटची स्वच्छता हि आधुनिक पद्धतीने होत असली तरी त्याचा वापर करणे कठीण असल्याने योग्य वापरात न आल्याने हे टॉयलेट्स अल्पावधीतच बंद पडले.

त्यानंतर याठिकाणी टॉयलेट्सचा वापर होण्याऐवजी टॉयलेट्सच्या आडोशाचा वापर लघवीसाठी करत आहेत. महापुरात या ई- टॉयलेट्सच्या शेजारी लावलेले पत्रे देखील रस्त्यावर वाकून आडवे आले असल्याने अपघाताची शक्यता आहे.

महाड हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे व या ठिकाणी बाजारपेठ आणि इतर सरकारी कार्यालय असल्याने बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांची व प्रवाशांची येथे कायम वर्दळ असते. महाड मध्ये छ. शिवाजी चौक येथे स्वच्छतागृह आहे. मात्र, याठिकाणी स्वच्छतेच्या नावाने बोंब आहे.

शिवाय या स्वच्छतागृहाचे काम देखील सुरु करण्यात आले आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. स्वच्छतागृहाची असणारी गरज लक्षात घेता पालिकेने या ठिकाणी दोन इ – टॉयलेट बांधली आहेत. याचा वापर आँगस्टपासुन सुरु करण्यात आला. परंतु ग्रामीण भागातील नागरिकांना या टॉयलेट बाबत व्यवस्थित ज्ञान नसल्याने याठिकाणी येणारा उपयोगकर्ता कोणत्याही प्रकारचे बटण दाबत असल्याने तसेच दरवाजा मोठ्याने उघडझाप करत असल्याने या पैकी एक टॉयलेट्स नादुरुस्त झाले आहे.

हि टॉयलेट आधुनिक असल्याने त्याचे सेंसर सध्या काम करत नसल्याने एक टॉयलेट नागरिकांकरिता बंद करण्यात आले आहे. त्यातच आलेल्या महापुरातदेखील या टॉयलेट्सचे नुकसान झाले आहे. संपूर्णपणे अत्याधुनिक असलेल्या या ई टॉयलेट्स ला सेंसर असल्याने हे नादुरुस्त झाले आहेत.

असे आहे ई टॉयलेट

ई – टॉयलेट पूर्णपणे स्वयंचलित असल्याने त्यांचा वापर योग्य तर्‍हेने करावा लागतो. या ठिकाणी बाँक्समध्ये पाच रुपयांचे नाणे टाकल्यानंतर दरवाजा उघडण्यापासून ते पूर्ण स्वच्छता करण्यापर्यंत सर्व कामे स्वयंचलित यंत्रणेने होत असतात. यासाठी काही बटणांचा वापर करावा लागतो. हे ई – टॉयलेट स्वयंचलित असून याची स्वच्छतादेखील सेंसर आधारित आहे.

“शहरातील ई – टॉयलेट्स बंद असल्या कारणाने येथील आडोशाचा आधार नागरिक लघुशंकेसाठी घेत आहेत. यामुळे या भागात दुर्गंधी पसरत आहे. प्रशासनाने हे पत्रे दूर करून येथील स्वच्छता करावी.”

– बंटी पाटील, स्थानिक नागरिक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here